बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

“पंतप्रधान नरेंद्र मोदींवर मी नाराज नाही, त्यांनी मला नेहमीच सन्मान दिला”

सिंधुदुर्ग | भाजपचे खासदार संभाजीराजे भोसले यांनी राज्यातील सर्व नेत्यांची भेट घेत राज्य सरकारला 6 जूनपर्यंत अल्टीमेट दिला आहे. मागील काही दिवसांपुर्वी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी वेळ दिली नाही, अशी जाहीर नाराजी संभाजीराजे यांनी व्यक्त केली होती. यावर संभाजीराजे यांनी आपली प्रतिक्रिया दिली आहे.

पंतप्रधान नरेंद्र मोदींवर नाराज असण्याचा प्रश्नच नाही. त्यांनी मला नेहमीच सन्मान दिला आहे. राष्ट्रपतीनियुक्त खासदार म्हणून त्यांनी मला राज्यसभेत नेमलं आहे. हे सगळं असलं तरी एक खासदार म्हणून आमच्या भावना मांडणं चुकीचं नसल्याचं, संभाजीराजे भोसले यांनी म्हटलं आहे. सिंधुदूर्गच्या दौऱ्यावर आहेत त्यावेळी त्यांनी माध्यमांशी संवाद साधला आहे.

नरेंद्र मोदी मला उद्याही भेटीसाठी वेळ देऊ शकतात पण हा वैयक्तिक भेटीचा प्रश्न नाही. समाजाचा विषय आहे. सगळ्या खासदारांना घेऊन मला त्यांना भेटायचं आहे. त्यामुळं मराठा आरक्षणाबाबत मत सांगण्याचा माझा प्रयत्न राहील, असंही संभाजीराजे भोसले म्हणाले.

दरम्यान, तौक्ते वादळामुळे झालेल्या  सिंधुदुर्ग किल्याच्या झालेल्या नुकसानीचा आढावा घेण्यासाठी संभाजीराजे सिंधुदूर्ग दौऱ्यावर आहेत. परंतू संभाजीराजे पाहायला आले त्यावेळी समुद्र खवळलेला असल्यामुळे त्यांना किल्यावर जाता आलं नव्हतं.

 

थोडक्यात बातम्या- 

“गिरीश बापट यांची दिल्लीत पत उरली आहे की नाही?, असा प्रश्न निर्माण झालाय”

घटस्फोटाच्या चार वर्षांनंतर पत्नीच्या कुटुंबियांना घरात कोंडून लावली आग, सासू आणि मुलीचा मृत्यू

‘गर्दी वाढतच राहिली तर…’; मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंचं मोठं वक्तव्य

दुकानदाराने असं कृत्य केलं की, पुण्यातील 19 वर्षीय तरूणीने केला आत्महत्येचा प्रयत्न

दिलासादायक! पुण्यात पहिलं ड्राईव्ह-इन व्हॅक्सिनेशन सेंटर सुरु; जाणून घ्या सविस्तर

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More