बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

‘गुन्हा दाखल करायचा असेल तर…’; खासदार संभाजीराजे भोसले कडाडले

नांदेड |  महाराष्ट्रात मराठा समाजाकडून मराठा आरक्षणासाठी मुक आंदोलन करण्यात येत आहेत. शुक्रवारी नांदेडमध्ये  झालेल्या मुक आंदोलनात कोविड प्रतिबंधात्मक नियमाचे उल्लंघन करण्यात आलं होतं. त्यामुळे मराठा समाजातील 21 जणांवर प्रशासनाने गुन्हे दाखल केले आहेत. याच पार्श्वभूमीवर बोलताना खासदार संभाजीराजे यांनी संताप व्यक्त केला आहे.

गुन्हा दाखल करायचा असेल तर माझ्यावर करा. सामान्य गरीब मराठा बांधवांवर का?, समाजाच्या प्रश्नांसाठी नांदेड येथे एकत्र आलेल्या मराठा बांधवांवर कोविडचे कारण दाखवून प्रशासनाने गुन्हा दाखल केले आहेत. राजकीय पक्षांना वेगळा न्याय आणि मराठा समाजाला वेगळा न्याय असं का? असा प्रश्नही संभाजीराजे यांनी केला आहे. यासंदर्भात संभाजीराजेंनी ट्विट करत मराठा आंदोलनावरून झालेल्या त्या गुन्ह्याची प्रत त्या ट्विटमध्येही दिली आहे.

शुक्रवारी मराठा समाजातर्फे नांदेडमध्ये मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी मुक मोर्चाची सुरूवात करण्यात आली होती . त्या आंदोलनाचं नेतृत्व संभाजीराजे यांनी केलं होतं. राज्यातल्या लॉकडाऊन नंतरचा हा पहिलाच मराठा समाजाचा मुक मार्चा होता. त्यावेळी बोलताना संभाजीराजेंनी आपली भूमिका मांडली.

दरम्यान, मी छत्रपती शिवाजी महाराज, शाहू महाराज यांचा विचार सांगायला या ठिकाणी आलो आहे. त्यांचा जयजयकार करण्यासाठी आलो आहे. जर माझं ऐकायचं असेल तर मला बोलूद्या, आणि माझे फोटो कितीही काढा, परंतु त्यांना काहीच फरक पडणार नाही, असंही संभाजीराजे म्हणाले.

 

 

थोडक्यात बातम्या- 

कौतुकास्पद! तरुणीने अपंगत्वावर मात करुन केला डान्स, पाहा व्हिडीओ

काय सांगता! कपाशीच्या पिकाला चक्क काकडी?, पाहा व्हिडीओ

गाडीत पाण्याची बाटली ठेवणं बेतलं जीवावर, पाहा व्हिडीओ

उद्धव ठाकरे आणि सोनिया गांधी बैठकीत नेमकं काय झालं?; संजय राऊतांचा गौप्यस्फोट

“बाळासाहेबांबद्दल आदर आणि उद्धव ठाकरेंविषयी गरळ, नारायण राणे म्हणजे दुतोंडी साप”

 

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More