बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

‘मी काय भाजपचा ठेका घेतला नाही’; खासदार संभाजीराजे आक्रमक

नाशिक | मराठा आरक्षणासाठी मी माझा महाल सोडून राज्य पिंजून काढत आहे. ही वेळ आक्रमक होण्याची नाही. प्लेगच्या साथीच्यावेळीही राजर्षी शाहू महाराजांनी असाच संयम दाखवला होता. आक्रमक व्हायला दोन मिनिटं लागतात. आंदोलनाला काय लागतं, आता लगेच करु. पण त्यामध्ये कोणी मयत झाले तर त्याला जबाबदार कोण, शाहुंचा वंशज, असा सवाल संभाजीराजे यांनी उपस्थित केला आहे.

मराठा आरक्षणासंदर्भात भाजपने त्यांची भूमिका घ्यावी. मी काही त्यांचा ठेका घेतलेला नाही. भाजपने मराठा समाजाच्या भावनेशी खेळू नये, यावर तोडगा सांगावा, असंही संभाजीराजे म्हणाले. ते नाशिकमध्ये आयोजित पत्रकार परिषदेत बोलत होते.

मी 27 तारखेला मुख्यमंत्री आणि विरोधी पक्षनेत्यांशीही चर्चा करणार आहे. या सगळ्यानंतर मी माझी भूमिका मांडेन तेव्हा मराठा आमदार आणि खासदारांनी माझं-तुझं केलं तर बघा, असा इशाराही संभाजीराजे यांनी दिला आहे.

माझ्याकडे अनुभव असला तरी मराठा आरक्षणाच्या प्रश्नावर माझ्यापेक्षा जास्त अभ्यास असलेले अनेकजण आहेत. त्यांच्याशी चर्चा करुन मी 27 तारखेला माझी भूमिका मांडेन, असं संभाजीराजेंनी सांगितलं आहे.

थोडक्यात बातम्या- 

नांदेडमध्ये माणुसकी मेली, पैसे उकळण्यासाठी मृत कोरोना रुग्णावर तीन दिवस उपचार

’14 तास खवळलेल्या समुद्रात पोहत होतो’; वादळातून बचावलेल्या सुनिलकुमारांनी सांगितला चित्तथरारक अनुभव

ऐकावं ते नवलंच, महामारीला पळवायचंय म्हणून थेट कोरोना देवीची स्थापना!

राज्यात म्युकरमायकोसिसचा धोका वाढला, पुढचे 10 दिवस अत्यंत महत्त्वाचे- राजेश टोपे

लग्नानंतर कोरोनाची बाधा, नवरदेवाची आठवडाभर मृत्यूशी झुंज, नियतीने घात केलाच

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More