महाराष्ट्र मुंबई

पुढील सुनावणीपर्यंत मराठा तरुणांचं काय?; खासदार संभाजीराजेंचा ठाकरे सरकारला सवाल

मुंबई | सर्वोच्च न्यायालयाच्या घटनापीठाने मराठा आरक्षणावरील स्थगिती उठवण्यास नकार दिला आहे. घटनापीठासमोर आजच हे प्रकरण आलं आहे. त्यावर विचार करण्यासाठी आपल्याकडे वेळ आहे. त्यामुळे यावर युक्तिवाद झाल्यावरच निर्णय घेण्यात येईल, असं घटनापीठाने म्हटलंय.

सर्वोच्च न्यायालयाने मराठा आरक्षणावरील स्थगिती उठवण्यास नकार दिल्यानंतर संभाजीराजेंनी माध्यमांशी संवाद साधला. आजच्या निर्णयावरून संभाजीराजेंनी काही प्रश्न उपस्थित करत राज्य सरकारला भूमिका स्पष्ट करण्याची मागणी केली आहे.

माझी सरकारला विनंती आहे, मुलांचं फार नुकसान होतंय. मुलांमध्ये आक्रोश निर्माण होतोय. त्यांना पुढे काय करायचं कळत नाहीये. तोपर्यंत इतर माध्यमातून त्यांना कशी मदत करता येईल याबाबत सरकारनं निर्णय घ्यावा, अशी मी विनंती करतो, असं संभाजीराजे म्हणालेत.

मी असं म्हणणार नाही की, रोहितगी आणि इतरांनी आपली बाजू चांगली मांडली नाही, असं मी म्हणणार नाही. रोहितगींसह सर्व सहकाऱ्यांनी जोमाने बाजू मांडली. पण बाजू मांडत असताना पुढची तारीख का मागितली हा प्रश्न माझ्यासारख्या सामान्य माणसाला समजला नाही, असं संभाजीराजे यांनी म्हटलंय.

थोडक्यात बातम्या-

“देशातील सर्व पेट्रोल पंपांचं नाव बदलून नरेंद्र मोदी वसुली केंद्र करा”

‘शेतकरी आंदोलनामागे पाकिस्तान आणि चीनचा हात’; दावनेंचा अजब दावा

‘खराब रस्ते बनवाल तर…’; नितीन गडकरींचा इशारा

“योगी आदित्यनाथ यांनी फिल्म सिटी उभारण्याबाबत दूरदृष्टी दाखवली, प्रकल्पात सहभागी व्हायला मला आवडेल”

शरद पवारांच्या नावाने ठाकरे सरकार लागू करणार ‘ही’ योजना!

मेलवर बातम्या मिळवा

खालील रिकाम्या बॉक्समध्ये तुमचा ई-मेल आयडी टाका आणि Subscribe म्हणा. आमच्या बातम्या तुम्हाला ई-मेलवर मिळतील.

ताज्या बातम्या