बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

मराठा आंदोलनावर खासदार संभाजीराजे यांची मोठी घोषणा, म्हणाले….

नाशिक | मराठा आरक्षण विषयावर सुरु असलेले आंदोलन कोणत्याही प्रकारे स्थगित अथवा थांबवण्यात आले नाही. परंतू, मान्य केलेल्या मागण्या पूर्ण करण्यासाठी राज्य सरकारनं 21 दिवसांचा अवधी लागणार असल्याचं म्हटलं आहे. मात्र आम्ही त्यांना एका महिन्याचा वेळ देतो आहे, अशी माहिती मराठा आरक्षण लढ्याचे नेते खासदार संभाजीराजे छत्रपती यांनी दिली आहे.

खासदार संभाजी छत्रपती यांनी आज सकाळी नाशिकमध्ये मूक मोर्चाचं आयोजन केलं होतं. त्यानंतर आता त्यांनी पत्रकार परिषद घेऊन त्यांची भूमिका स्पष्ट केली. ठाकरे सरकारनं समाजाच्या बहुतांश मागण्या पूर्ण केल्या आहेत. समाजासाठी काही हजार कोटींची जी मागणी केली होती, त्याच्या पूर्ततेसाठी सरकारला 21 दिवसांचा वेळ देण्याचं आवाहन उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी केलं आहे. ते म्हणाले की, मराठा समाज खूश होईल, एवढी रक्कम आम्ही 21 दिवसांत जाहीर करु. तेवढा वेळ द्या, असं आवाहन पवारांनी केल्यामुळे आम्ही त्यांना महिन्याभराचा वेळ द्यायचं ठरवलं आहे, असं संभाजीराजे छत्रपतींनी जाहीर केलं.

सर्व जिल्ह्यांत आंदोलन करण्याच्या इच्छा नाही. राज्य सरकारनं त्यांच्या हातातील 10 मागण्या मार्गी लावाव्यात, अशी मागणी खासदार संभाजीराजे छत्रपती यांनी केली आहे. मराठा आरक्षणासंदर्भात नाशिकमध्ये आज मूक आंदोलन झाले. त्यावेळी ते बोलत होते. तर कुणाच्याही आरक्षणाला धक्का न लावता मराठा समाजाला आरक्षण मिळाले पाहिजे, अशी भूमिका यावेळी पालकमंत्री छगन भुजबळ यांनी मांडली.

दरम्यान, सरकारनं एक महिन्यात मागण्या पूर्ण कराव्यात नाही तर पुढची दिशा ठरवावी लागेल, असं संभाजी छत्रपती यांनी सांगितलं. तसेच मराठा मूक मोर्चा एक महिन्यासाठी स्थगित करण्यात येत असल्याचंही त्यांनी स्पष्ट केलं.

थोडक्यात बातम्या – 

“महाराष्ट्र सरकारने पळवाट न काढता निदान 15 दिवस तरी अधिवेशन बोलवावं”

सोनिया गांधी ॲक्शन मोडमध्ये, बोलावली महत्वाची बैठक; ‘या’ गोष्टींवर होणार चर्चा?

अखेर प्रतिक्षा संपली! ‘बिग बाॅस मराठी 3’ लवकरच येणार प्रेक्षकांच्या भेटीला

‘झाडे लावा आणि जास्त मार्क मिळवा’, ‘या’ ठिकाणी विद्यार्थ्यांसाठी सुरु केली अनोखी योजना

काय सांगता! आता केवळ आवाजाने चार्ज होणार MIचा स्मार्टफोन

Shree

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More