बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

मराठा आरक्षणासाठी खासदार संभाजीराजेंची महाराष्ट्र दौऱ्याला सुरुवात; आज ‘या’ ठिकाणी देणार भेट

कोल्हापूर | 27 तारखेला मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याशी मराठा आरक्षणाच्या विषयावर चर्चा करणार असल्याचं खासदार संभाजीराजेंनी सांगितलं होतं. एकदा मी पाय पुढे टाकला की मागे घेणार नाही. 27 तारखेला मुख्यमंत्री आणि विरोधी पक्षनेत्यांशीही चर्चा करणार आहे. या सगळ्यानंतर मी माझी भूमिका मांडेन तेव्हा मराठा आमदार आणि खासदारांनी माझं-तुझं केलं तर बघा, असा इशारा संभाजी राजेंनी दिला होता. यातच आता त्यांनी महाराष्ट्र दौऱ्याला सुरवात केली आहे.

आरक्षणाचे जनक राजर्षी शाहू छत्रपती महाराज यांच्या समाधीस्थळाला अभिवादन करुन मराठा आरक्षणाविषयी मते जाणून घेण्यासाठी खासदार संभाजी राजे यांनी महाराष्ट्र दौऱ्याला सुरुवात केली आहे. या दौऱ्याच्या माध्यमातून सामान्य माणसांची मते राज्य सरकार व केंद्र सरकारपर्यंत पोहोचवण्याच्या उद्देशाने हा दौरा आयोजित करण्यात आला आहे.

या दौऱ्यात वेगवेगळ्या क्षेत्रातील जास्तीतजास्त लोकांना भेटून ते लोकांशी संवाद साधण्याचा प्रयत्न करणार आहे. कोल्हापूरातील समाजातील प्रतिनिधींशी संभाजीराजे यांनी चर्चा केली आहे. कोल्हापूरनंतर ते पंढरपूर, सोलापूर, तुळजापूर, उस्मानाबाद, नांदेड असा दौरा करणार आहेत.

दरम्यान, कोल्हापूरातील इतर समाजातील प्रतिनिधींनी देखील या प्रसंगी उपस्थित राहून मराठा समाजाला जाहीर पाठिंबा दिला आहे. या सर्वांचा मराठा समाजाच्या वतीने मी अत्यंत ऋणी आहे, अशी प्रतिक्रिया संभाजीराजे यांनी दिली आहे.

थोडक्यात बातम्या

पुण्यात विजांच्या कडकडाटासह मुसळधार पावसाची शक्यता!

लग्नाच्या वाढदिवसाला दिलेला एक किलो सोन्याचा हार निघाला नकली!

26 वर्षीय डॉक्टरचा कोरोनाने मृत्यू; अरविंद केजरीवालांनी घरी जाऊन केलं कुटुंबियांचं सांत्वन

‘तिसऱ्या लाटेची भिती बाळगू नका’; बालरोगतज्ज्ञांनी दिला महत्वाचा सल्ला

‘लसीच्या तुटवड्याला केंद्र सरकारच जबाबदार’ या वक्तव्याशी आमचा संबंध नाही; सीरमचं स्पष्टीकरण

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More