बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

मराठा आरक्षणाबाबत खासदार संभाजीराजेंचं मुख्यमंत्र्यांना पत्र; केली ‘ही’ महत्वाची मागणी

मुंबई | राज्य मागासवर्ग आयोगाच्या अहवालावर आधारीत महाराष्ट्र विधिमंडळाने पारीत केलेला मराठा आरक्षण कायदा सर्वोच्च न्यायालयाने रद्द ठरविला आहे. याबाबत निर्णय देत असताना सर्वोच्च न्यायालयाने काही मुद्दे मांडलेले आहेत.त्यापैकी 102 व्या घटनादुरूस्ती नंतर राज्यांना मागास प्रवर्ग ठरविण्याचे अधिकार राहत नाहीत, असं सर्वोच्च न्यायालयाने सांगितलं होतं. याच संदर्भात खासदार संभाजीराजे यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना पत्र लिहलं आहे.

102 वी घटनादुरूस्ती राज्यसभेत मंजूर करण्यापूर्वी सिलेक्ट कमिटी नेमली गेली होती, ज्यामध्ये 25 संसद सदस्यांच्या समितीपुढे हा विषय ठेवण्यात आला. या समितीने आपल्या अहवालामध्ये 12 व्या मुद्द्यात ‘या घटनादुरूस्तीमुळे राज्य मागासवर्ग आयोगांना मागास यादीमध्ये एखादा प्रवर्ग समाविष्ट करण्याचा असलेला अधिकार बाधित होत नाही,’ असे स्पष्टपणे नमूद केले आहे, अशी माहिती संभाजीराजेंनी या पत्रात दिली आहे.

मराठा आरक्षणाची सुनावणी सर्वोच्च न्यायालयात सुरू असताना, 102 वी घटनादुरूस्ती व राज्यांचे अधिकार यांबाबत संभ्रम निर्माण झाला होता. यावेळी संभाजी राजे यांनी केंद्रीय सामाजिक न्यायमंत्री थावरचंद गेहलोत यांची भेट घेऊन, केंद्र सरकारच्या वतीने न्यायालयात प्रतिज्ञापत्र दाखल करून हा संभ्रम दूर करावा, अशी विनंती केली होती. केंद्र सरकारच्या वतीने न्यायालयात राज्यांचे अधिकार बाधित होतं नसल्याचं स्पष्टपणे मांडण्यात आलं, असंही या पत्रात म्हटलं आहे.

न्यायालयाने मराठा आरक्षणावर अंतिम निकाल देताना,102 व्या घटनादुरूस्तीमुळे राज्य शासनास आरक्षण देण्याचे अधिकार नसल्याचं मत नोंदविले आहे. याबाबत केंद्र शासनाने सर्वोच्च न्यायालयात फेरविचार याचिका दाखल केली आहे. त्याच पद्धतीने हा संपूर्ण विषय महाराष्ट्र शासनाशी व शासनाला असलेल्या अधिकारांशी थेट निगडीत असल्यानं, तसेच राज्य मागासवर्ग आयोगाचा संपूर्ण अहवाल न्यायालयासमोर ठेवताना राहिलेल्या त्रूटी दूर करण्यासाठी व अंतिमतः मराठा आरक्षण टिकविण्यासाठी महाराष्ट्र शासनाच्या वतीने देखील अशी फेरविचार याचिका दाखल करण्यासंदर्भात आवश्यक ती कार्यवाही त्वरीत करण्यात यावी, अशी मागणी संभाजी राजे यांनी केली आहे.

पाहा पत्र –

थोडक्यात बातम्या-

अक्षय्य तृतीयेच्या मुहूर्तावर विठू-रखुमाई आणि श्रीमंत दगडूशेठ गणपतीला हापूस आंब्याची आरास

विधवेवर पोलिसाकडूनच बलात्कार, गावकऱ्यांनी असा शिकवला धडा

कोरोनाचा राग, रेमो डिसूझावर निघाला! कोरियोग्राफर हसून हसून लोटपोट झाला, पाहा व्हिडीओ

राज्यात 4 दिवस पावसाचा इशारा; अरबी समुुद्रातलं ‘तोक्ते’ चक्रीवादळ ‘या’ किनारपट्टीवर धडकणार

परमबीर सिंह यांना अटक करणार?; राज्य सरकारची न्यायालयात मोठी माहिती

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More