Top News कोल्हापूर महाराष्ट्र

“विजयदुर्गची पडझड रोखण्यासाठी आजची बैठक सकारात्मक, शिवभक्तांच्या वतीने मंत्रीमहोदयांचे आभार”

कोल्हापूर |  विजय दुर्ग ढासळतोय, त्याची समुद्राच्या लाटांनी झीज होत आहे. महाराष्ट्राची सांस्कृतिक ओळख असलेले जवळपास सर्वच गडकिल्ले आज अस्तित्वासाठी संघर्ष करत असल्याची खंत काही दिवसांपूर्वीच फेसबुक पोस्ट लिहून संभाजीराजे यांनी व्यक्त केली होती. त्यानंतर आज संभाजीराजे यांनी थेट केंद्रिय सांस्कृतिक मंत्र्यांची भेट घेत विजयदुर्ग किल्ल्याची पडझड रोखण्यासाठी तात्काळ उपाय योजना करण्यात याव्यात, अशी मागणी केली.

विजयदुर्ग किल्ल्याची पडझड रोखण्यासाठी तात्काळ उपाय योजना करण्यात याव्यात यासाठी आज केंद्रीय सांस्कृतिक मंत्री प्रल्हाद सिंह पटेल यांची भेट घेतली. यावेळी दुरुस्ती करण्यासाठी लेखी पत्र सुध्दा दिले, अशी माहिती संभाजीराजे यांनी दिली.

बैठकीमध्ये स्वराज्यात आरमाराचे व समुद्री किल्ल्यांचे महत्व सांगून हा अनमोल ठेवा जतन करण्यासाठी लवकरात लवकर प्रयत्न करावेत अशी मागणी केल्याचं संभाजीराजेंनी सांगितलं. तसंच मंत्री पटेल यांनी देखील तातडीने केंद्रीय पुरातत्व खात्याला इस्टीमेट तयार करण्याचे आदेश दिले, ते म्हणाले.

पावसाळा संपताच पुनर्बांधणीचे काम सुरू करण्याचे आदेश देण्यात आले. तसेच आवश्यक आहेत त्या सर्व कागदोपत्री परवानग्या आठवडाभरात पूर्ण झाल्या पाहिजेत अशी सूचना सुद्धा त्यांनी केल्याचं संभाजीराजेंनी सांगितलं आहे.

आजची बैठक अत्यंत सकारात्मक झाली त्यामुळे केंद्रीय मंत्री प्रल्हाद सिंह पटेल यांचे सर्व शिवभक्तांच्या वतीने मी आभार व्यक्त करतो. त्यांनी परिस्थितीचे गांभीर्य आणि शिवभक्तांच्या भावनांचा आदर करीत तात्काळ निर्णय घेतले, असंही संभाजीराजे यांनी म्हटलं.

महत्त्वाच्या बातम्या-

प्रसिद्ध मॉडेल ते UPSC परीक्षेत ९३ वी रँक… , या तरुणीचा प्रेरणादायी प्रवास वाचून थक्क व्हाल..!

पुराचा धोका ओळखून मंत्री हसन मुश्रीफांच्या जिल्हा प्रशासनाला या तातडीच्या सूचना

संयम ठेवलाय म्हणणाऱ्या आदित्य ठाकरेंना भाजपचा सवाल, ‘संयम सुटला तर काय कराल?’

चीनमध्ये नव्या व्हायरसचा धुमाकूळ; तब्बल इतक्या लोकांना झालीय ‘या’ व्हायरसची लागण

जेव्हा कमळाचं राज्य येईल तेव्हाच…., राम मंदिर भूमीपूजनावर शत्रुघ्न सिन्हा यांचं ट्विट!

मेलवर बातम्या मिळवा

खालील रिकाम्या बॉक्समध्ये तुमचा ई-मेल आयडी टाका आणि Subscribe म्हणा. आमच्या बातम्या तुम्हाला ई-मेलवर मिळतील.

ताज्या बातम्या