राम मंदिर सोडा आणि विकासाची कास धरा; खासदार संजय काकडेंचा मोदींना सल्ला

पुणे | पाच राज्याच्या धक्कादायक निकालानंतर भाजप खासदार संजय काकडे यांनी भाजपला सल्ला दिला आहे. राम मंदिर सोडा आणि विकासाची कास धरा, असं त्यांनी म्हटलं आहे. 

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी 2014 साली विकासाचा नारा दिला होता. हा नारा पुन्हा देण्याची वेळ आली आहे, असं संजय काकडे म्हणाले. 

तिन्ही राज्यात आमचे 62 खासदार आहेत, संघाचं मोठं जाळं आहे तरीही आम्हाला पराभव स्वीकारावा लागत असेल तर ही धोक्याची घंटा आहे, असं ते म्हणाले. 

दरम्यान, मंदिर-मस्जिद-पुतळे हे मुद्दे सोडण्याची वेळ आली आहे. मध्य प्रदेशमध्ये काठावर सत्ता आली तरी तो आमचा पराभव असेल, असं ते म्हणाले. 

महत्वाच्या बातम्या –

-मुख्यमंत्री वसुंधरा राजे स्वतः सावरल्या; मात्र भाजपची नौका बुडवली!

-समझदार को इशारा काफी है; संजय राऊतांचा मोदींना टोला

-कार्यालयात झेंडे लावून भाजप कार्यकर्ते कुठे गेले?

भाजपला दणके बसताच मोदी हादरले; निवासस्थानी बोलावली तातडीची बैठक

मिझोरमनं ‘हात’ झटकला; काँग्रेस सत्तेवरुन पायउतार होणार?