मुंबई | भाजपचे डझनभर आमदार फुटणार आहेत, अशी माहिती समोर आली होती. त्यावर भाजपचा कोणताही आमदार महाविकास आघाडीसोबत जाणार नाही. आघाडीकडे 169 चा आकडा आहे. विनाकारण कोण कशाला निमंत्रण देईल. आमच्या आमदारांशी संपर्क करण्याआधी मंत्र्यांचं खातेवाटप करा, अशी खोचक टीका भाजपचे राज्यसभेचे खासदार संजय काकडे यांनी केली आहे.
काँग्रेस राष्ट्रवादी आणि शिवसेना यांच्याकडे 169 चा आकडा आहे ना? मग ते भाजप आमदारांना कशाला निमंत्रण देतील, असं काकडे म्हणाले. उदयनराजेंचा दाखला देत कोणताही आमदार पक्ष सोडणार नाही. नाहीतर त्यांना जनतेच्या रोषाला सामोरं जावं लागेल, असंही सांगायला काकडे विसरले नाहीत.
शिवसेना काँग्रेस आणि राष्ट्रवादीच्या नेत्यांनी महाराष्ट्राला प्रगतीप्रथावर कसं घेऊन जाता येईल, यासाठी लक्ष देणं आणि काम करणं आवश्यक असल्याचाही टोला त्यांनी यावेळी लगावला.
निवडणुकीच्या तोंडावर ज्या नेत्यांनी काँग्रेस आणि राष्ट्रवादीतून भाजपत प्रवेश केला होता तेच लोक आता स्वगृही परतणार असल्याच्या चर्चा सुरू आहेत या प्रश्नावर मला अजिबात असं वाटतं नाही. भाजप नेतृत्वावर त्यांचा विश्वास असल्याचंही काकडे यांनी स्पष्ट केलं.
महत्त्वाच्या बातम्या-
“सत्ता गेल्याचं पचत नाही म्हणून ‘वाघा’सारखी जनावरं काहीही बरळत सुटली आहेत” https://t.co/8dYqAzaAfr @dhananjay_munde @Avadhutwaghbjp @BJP4Maharashtra @NCPspeaks
— थोडक्यात (@thodkyaat) December 5, 2019
मेहबूबा मुफ्तींची लेक म्हणते… हा देश आता मुस्लिमांचा राहिला नाही https://t.co/uEbuWrgwaV @MehboobaMufti
— थोडक्यात (@thodkyaat) December 5, 2019
शिवसैनिकांचा भाजप प्रवेशाचा दावा शिवसेनेने फेटाळला! https://t.co/hB9wVKQSW8 #ShivSena #BJP
— थोडक्यात (@thodkyaat) December 5, 2019
Comments are closed.