शरद पवार विरोधी पक्षात राहूनच चांगलं काम करु शकतात!

पुणे | राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार विरोधी पक्षात राहूनच चांगलं काम करु शकतात, असा टोला भाजपचे सहयोगी खासदार संजय काकडे यांनी लगावलाय. ते पुण्यात एका वृत्तवाहिनीशी बोलत होते.

 शरद पवार जेव्हा जेव्हा ते विरोधी पक्षात राहिले आहेत, तेव्हा तेव्हा त्यांनी विरोधी पक्षाचं काम खूप चांगल्या प्रकारे केलं आहे. उलट पवारांनी मोदींचं अभिनंदन करायला हवं, असं ते म्हणाले.

दरम्यान, शरद पवार केंद्रीय मंत्री असताना त्यांनी स्वामिनाथन आयोगाचा अहवाल मान्य केला असता तर शेतकऱ्यांच्या आत्महत्या झाल्याच नसत्या, असंही त्यांनी सांगितलं.