बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

संजय राऊतांनी घेतली प्रियंका गांधींची भेट; तासभर चर्चेनंतर राऊत म्हणाले…

नवी दिल्ली | देशात सध्या मोठ्या राजकीय (Politics) घडामोडी घडत आहेत. आगामी काळात देशात पाच राज्याच्या विधानसभेच्या निवडणुका होणार आहेत. परिणामी सर्व पक्षांनी आपापली तयारी चालू केली आहे. अशातच महाविकास आघाडीच्या (MVA Allaince) माध्यमातून एकत्र आलेले शिवसेना (Shivsena) आणि काॅग्रेसमध्ये (Congress) सध्या जवळीक वाढत आहे. शिवसेनेचे प्रवक्ते संजय राऊत (MP Sanjay Raut) यांनी आज दिल्लीत काॅंग्रेस महासचिव प्रियंका गांधी (Congress Leader Priyanka Gandhi) यांची भेट घेतली आहे.

शिवसेना सध्या महाराष्ट्राबाहेर आपली राजकीय शक्ती वाढवण्याची शक्याता आहे. परिणामी शिवसेना गोवा आणि उत्तर प्रदेशात आपली ताकद आजमावताना दिसणार आहे. संजय राऊत आणि प्रियंका गांधी यांनी आजच्या भेटीत युपी आणि गोवा राज्याच्या विधानसभा निवडणुकीवर चर्चा केली. त्यांची चर्चा सकारात्मक झाल्याचं संजय राऊत म्हणाले आहेत.

महाविकास आघाडीचा पॅटर्न आम्ही गोवा आणि युपीमध्ये राबवण्याचा विचार करत आहोत. परिणामी शिवसेना आणि काॅंग्रेस एकत्रितपणे विधानसभा निवडणुकीत उतरण्याची शक्यता आहे. गांधी आणि राऊत यांच्यात तब्बल एकतास चर्चा झाली आहे. उत्तर प्रदेश निवडणुकीच्या संदर्भात ही चर्चा झाल्याची माहिती मिळत आहे.

दरम्यान, उत्तर प्रदेशात फारसा जनाधार नसलेला शिवसेना पक्ष आपल्या हिंदुत्ववादी भूमिकेमुळं थोडाफार प्रभाव टाकू शकतो. तसंच काॅंग्रेसनं प्रियंका गांधी यांच्या नेतृत्वात उत्तर प्रदेशमध्ये ताकद लावली आहे. त्यामुळे आता उत्तर प्रदेशात काँग्रेसला मोठी संधी मिळू शकते.

थोडक्यात बातम्या 

IAF Helicopter Crash: अपघातात 14 पैकी 13 जणांचा मृत्यू; आली महत्त्वाची माहिती समोर

“मी पाहिलं की आग लागलेल्या अवस्थेत…”; प्रत्यक्षदर्शीनं सांगितली बिपीन रावत यांच्या अपघाताची माहिती

अपघाताच्या 24 तासांपूर्वी बिपीन रावत यांनी दिला होता ‘हा’ गंभीर इशारा

“2024 मध्ये भाजपचे 418 खासदार येणार, सगळे मोदींनाच मतदान करणार”

Vasant More | अन् राजसाहेब मला म्हणाले,”तू काही स्ट्रेसमध्ये आहेस का?”

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More