Top News महाराष्ट्र मुंबई

संजय राऊतांचं भाजपला ओपन चॅलेंज; “हिंमत असेल तर महाराष्ट्रात ‘हे’ करुन दाखवा!”

मुंबई | शिवसेना खासदार संजय राऊत सातत्याने भाजपशी पंगा घेत असल्याचं पहायला मिळतं. सरकार पाडण्याच्या मुद्द्यावरुन आता संजय राऊत यांनी भाजपला धारेवर धरलं आहे, तसेच हिंमत असेल तर भाजपने महाराष्ट्रातील महाविकास आघाडीचं सरकार पाडून दाखवावं, असं चॅलेंज त्यांनी भाजपला दिलं आहे.

कोणताही मुहूर्त काढा, आमचे सरकार पाच वर्षे चालणारच. काहींना जुगार खेळण्याचा छंद असतो, ते जुगार खेळत राहतात. हे मध्य प्रदेश नाही तर महाराष्ट्र आहे, अशा शब्दात त्यांनी भाजपचा समाचार घेतला.

राज्यपालांचा परीक्षा घेण्याचा हट्ट चुकीचा असल्याचं नियतीनं दाखवून दिलं आहे. राज्यपालांनी या निर्णयाचा पुनर्विचार करावा. देशात आणि राज्यात परिस्थिती गंभीर आहे, अशा परिस्थितीत मुलांना आणि त्यांच्या पालकांना संकटात टाकायचे का?, असा सवाल देखील त्यांनी विचारला. राजभवनात कोरोनाचा शिरकाव झाल्याच्या वृत्ताचा त्यांच्या बोलण्याला संदर्भ होता.

दरम्यान, परीक्षा न घेण्याच्या निर्णयावर राज्य सरकार ठाम आहे. शिक्षणमंत्री उदय सामंत सातत्याने यासंदर्भात भूमिका मांडत आहे, दुसरीकडे राज्यपाल मात्र परीक्षा घेण्यावर ठाम आहेत. त्यामुळे चांगलाच वाद पेटला आहे.”

महत्त्वाच्या बातम्या-

‘तुला मनसे सांगणं आहे…’, रूपाली पाटील यांनी केतकी चितळेला सुनावले खडे बोल

दया नायकांनी पकडलेल्या विकास दुबेच्या हस्तकांना एन्काऊंटरची भीती, केली ‘ही’ मागणी

राजभवनात कोरोनाचा शिरकाव…राज्यपालांची पहिली प्रतिक्रिया, म्हणतात…

‘लवकरात लवकर जयपूरला या…’ दिल्लीत ठाण मांडलेल्या आमदारांना मुख्यमंत्री गेहलोतांचे आदेश

धारावी कोरोनामुक्तीचं श्रेय सरकारचं नसून RSSचं, स्वयंसेवकांनी जीव धोक्यात घालून काम केलं- चंद्रकांत पाटील

मेलवर बातम्या मिळवा

खालील रिकाम्या बॉक्समध्ये तुमचा ई-मेल आयडी टाका आणि Subscribe म्हणा. आमच्या बातम्या तुम्हाला ई-मेलवर मिळतील.

ताज्या बातम्या