बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

“ज्यांनी स्वातंत्र्य आणि लोकशाहीवर हल्ले केले ते राजकारणातून संपले, हा या देशाचा इतिहास”

नवी दिल्ली | ज्यांनी स्वातंत्र्य आणि लोकशाहीवर हल्ले केले ते राजकारणातून नंतर संपले. हा या देशाचा इतिहास आहे. सरकार कोणत्याच विषयावर बोलायला तयार नाही. सरकारला विरोधकांचा आवाजच ऐकायचा नाही, असा आरोप शिवसेना नेते आणि खासदार संजय राऊत यांनी केंद्र सरकारवर केलाय.

देशात जे काही हेरगिरीचं कांड झालंय ते जाणून घ्यायचा देशाला अधिकार नाही का? सरकार अधिकार नाकारत असेल तर या देशातील लोकशाही आम्ही मोडीत काढली आहे. या देशात लोकशाही, संसदीय लोकशाही, संसद या संस्था आम्ही शिल्लक ठेवल्या नाहीत हे त्यांनी सांगावं, असं म्हणत राऊतांवर केंद्रावर निशाणा साधलाय.

राष्ट्रीय सुरक्षेच्या मुद्द्यावर. पेगासस हा राष्ट्रीय सुरक्षेचा प्रश्न आहे. त्यावर बोलणार नाही हे किती काळ चालणार. त्यामुळे कोर्टात न्याय मागण्याशिवाय आमच्याकडे पर्याय नाही, असंही राऊतांनी सांगितलं.

तुम्ही पेगॅससवर बोलत नाही, शेतकऱ्यांच्या प्रश्नांवर बोलत नाही, महागाईवर बोलायला तयार नाहीत, मग तुम्ही कोणत्या विषयावर बोलणार आहात? तुमची अपेक्षा काय आहे? विरोधी पक्षाने सत्ताधाऱ्यांची फक्त चमचेगिरी करावी का? हे चालणार नाही. विरोधी पक्ष आणि सत्ताधाऱ्यांनी हातात हात घालून देशाचं काम करावं ही आमची भूमिका आहे. अनेक प्रश्नांवर एकत्र येणं गरजेचं आहे, असं मत राऊतांनी व्यक्त केलं आहे.

थोडक्यात बातम्या-

“जिथे सत्ता नाही तिथे राज्यपालांच्या माध्यमातून भाजप सत्ता राबवतंय”

कपिल शर्मावर भडकला अक्षय कुमार, म्हणाला…

पूरग्रस्तांची मदत करण्यासाठी गेलेल्या मंत्र्यांनाच पडली मदतीची गरज, पाहा व्हिडीओ

वाढदिवसाच्या नावाखाली केकची नासाडी, सोशल डिस्टन्सिंगचा फज्जा, पाहा व्हिडीओ

नोकरदारांसाठी गुड न्यूज; एकाच वेळी खात्यावर मोठी रक्कम जमा

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More