मध्य प्रदेशमध्ये ‘पद्मावती’वर बंदी, शिवराज सिंहांची घोषणा

भोपाळ | दिग्दर्शक संजय लिला भन्साळी यांच्या पद्मावती सिनेमावरुन सुरु असलेला वाद काही थांबण्याचं नाव घेत नाहीये. आता मध्य प्रदेशचे मुख्यमंत्री शिवराज सिंह चौहान यांनी मध्य प्रदेशमध्ये या सिनेमावर बंदी घालण्याची घोषणा केलीय. 

महाराणी पद्मावतीच्या आयुष्यात छेडछाड करणं निंदनीय आहे. मध्य प्रदेशच्या जमिनीवर हा सिनेमा प्रदर्शित होणार नाही, असं शिवराज सिंह चौहान यांनी म्हटलंय. 

मुख्यमंत्री शिवराज सिंह यांच्या या घोषणेमुळे आता नवा वाद उभा राहण्याची शक्यता आहे.