बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

खासदार सुजय विखेंनी दिल्लीहून आणली 300 रेमडेसिवीर, नगरमध्ये मोफत वाटप

अहमदनगर | सध्या कोरोनाचा प्रादुर्भाव देशभरात मोठ्या प्रमाणात वाढत आहे. कोरोनारूग्णांची दिवसाला वाढणारी आकडेवारीही धक्कादायक आहे. कोरोना विषाणू आव वासून बसलेला असताना ऑक्सिजन आणि बेडची कमतरता पडली आहे. यासह रेमडेसिवीर इंजेक्शनता तुटवडा यामुळे मोठी समस्या निर्माण झाली आहे. या इंजेक्शवरून राजकारण तापलं आहे. मात्र अशातच नगरचे भाजपचे खासदार डॉ. सुजय विखे पाटील यांनी 300 रेमडेसिवीर इंजेक्शनचं मोफत वाटप केलं आहे.

डॉ. सुजय विखे पाटलांनी राजधानी दिल्लीहून तीनशे रेमडेसिवीर इंजेक्शन आज नगर जिल्ह्यात आणली. ही इंजेक्शन शिर्डी संस्थान, प्रवरा रुग्णालय आणि नगरच्या सरकारी रुग्णालयालाला मोफत वाटप केलीत. या वाटपानंतर भाजपचे ज्येष्ठ नेते राधाकृष्ण विखे-पाटील यांनी राज्य सरकारवर टीका केली.

आज दुपारी ही इंजेक्शन विमानाने शिर्डीला पोहचली. त्यानंतर राधाकृष्ण विखे-पाटील यांच्या हस्ते मोफत देण्यात आलीत. राज्यात सध्या या इंजेक्शनचा तुटवडा आहे. मुंबईतील एका घटनेवरून सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये घमासान पहायला मिळत आहे. सुजय विखे पाटलांनी इंजेक्शम दिल्लीमध्ये कोठूण आणलीत याबाबत काही सांगण्यात आलं नाही.

दरम्यान, कोरोनाची परिस्थिती हाताळण्यास राज्य सरकार अपयशी ठरलं आहे. आपलं हे अपयश झाकण्यासाठी सतत केंद्राकडे बोट दाखवण्याचा प्रयत्न केला जात आहे. या गडबडीत निरपराध लोकांचा हकनाक बळी जात आहे. मंत्री येतात आणि आश्वसने देऊन जातात, पुढे काहीच होत नसल्याचं म्हणत राधाकृष्ण विखे-पाटलांनी सरकारला धारेवर धरलं.

थोडक्यात बातम्या- 

राजस्थानपुढे महेंद्रसिंह धोनीच्या बलाढ्य चेन्नईला रोखण्याचं आव्हान, कोण मारणार बाजी?

“म्हणे फडणवीसांना अटक करा; अटक मटक चवळी चटक वाटलं की काय?”

संपूर्ण जगासाठी आनंदाची बातमी; कोविडवर पूर्णत: मात करणारा इस्त्रायल पहिला देश

कोरोनाची माहिती शेअर करत असाल तर सावधान, ‘या’ तरुणासारखं तुमच्यासोबतही घडू शकतं!

‘या’ लोकांना कोरोनाचा धोका अधिक; केंद्र सरकारनं जाहीर केली यादी

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More