महाराष्ट्र मुंबई

केंद्र सरकारमुळेच देशात बेरोजगारी आणि महागाई- सुप्रिया सुळे

मुंबई | गेल्या 5 वर्षात देशातील बेरोजगारी आणि महागाई वाढतंच चालली आहे. केंद्र सरकारच्या चुकीच्या धोरणांमुळेच महागाईचा भडका उडालाय, असा आरोप राष्ट्रवादी काँग्रेसच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी केला आहे. ठाण्यातील एका क्लीनिकच्या उद्घाटनाच्या वेळी त्या बोलत होत्या.

राष्ट्रवादी काँग्रेसने गॅस सिलेंडर दरवाढीविरोधात देशभरात निदर्शने केली. केंद्र सरकारमुळेच सर्वसामान्यांना महागाईला सामोरे जावे लागत आहे, असा आरोपही सुप्रिया सुळेंनी यावेळी  केंद्र सरकारवर केला आहे.

मंत्र्यांच्या बंगल्यांना लाखो रुपयांचा चुराडा केला जातो. याबाबत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी याआधी भाष्य केलं आहे. जे सर्वसामान्य नागरिकांच्या मनात आहे तेच झालं पाहिजे. तर स्वातंत्र्यवीर सावरकरांविषयी वादग्रस्त उल्लेख केल्यामुळे काँग्रेसच्या मुखपत्रावर बंदी घालण्याची मागणी विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीसांनी केली असल्याचंही सुप्रिया सुळेंनी सांगितलं आहे.

दरम्यान, आमचं दडपशाहीचं सरकार नाही आणि माजी मुख्यमंत्री काही बोलत असतील तर तो त्यांचा अधिकार आहे. त्यांच्यात आणि आमच्या सरकारमध्ये हाच तर फरक असून मनमोकळेपणाने कोणालाही बोलण्याचा अधिकार आहे, असा टोलाही सुळेंनी फडणवीसांना लगावला.

ट्रेंडिंग बातम्या-

सोनिया गांधींना लिहलेल्या ‘त्या’ पत्रावर अशोक चव्हाण म्हणतात…

…म्हणून मला शरद पवारांवर पीएचडी करवीशी वाटते- चंद्रकांत पाटील

महत्वाच्या बातम्या-

चिमुरडी कोल्हेंना म्हणाली, ‘बाहेर जाऊ नका ते तुम्हाला पकडतील’…

“सुट्ट्यांच्या बाबतीत समान नागरी कायदा असावा असं कुणाला का वाटू नये”

मी पहिल्यांदा भारतीय नागरीक नंतर गायक- अदनान सामी

मेलवर बातम्या मिळवा

खालील रिकाम्या बॉक्समध्ये तुमचा ई-मेल आयडी टाका आणि Subscribe म्हणा. आमच्या बातम्या तुम्हाला ई-मेलवर मिळतील.

ताज्या बातम्या