बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

सुप्रिया सुळे म्हणतात,”माझी केंद्र सरकारला नम्र विनंती आहे की…”

मुंबई | स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीसाठी ओबीसींना (OBC Reservation) 27 टक्के आरक्षण देता येणार नाही, असा निर्वाळा सर्वोच्च न्यायालयाने दिला आहे. न्यायालयाच्या या निर्णयानंतर आता राज्यातील वातावरण पेटताना दिसत आहे.  महाविकास आघाडीतील नेते आणि भाजप नेते यांच्यात आता कलगीतुरा रंगताना दिसतोय. अशातच राष्ट्रवादीच्या खासदार सुप्रिया सुळे (MP Supriya Sule) यांनी केंद्र सरकारकडे इम्पेरिकल डाटाची (Imperial data) मागणी केली आहे.

ओबीसी आरक्षणासाठी केंद्र सरकारने इम्पेरिकल डाटा द्यावा आणि तुमची भूमिका स्पष्ट करावी, असं सुप्रिया सुळे म्हणाल्या आहेत. केंद्र सरकारला नम्र विनंती आहे की, केंद्राने जर इम्पेरिकल डाटा दिला तर पंचायत राजमध्ये जो अन्याय होतोय तो होणार नाही. माझ्याच राज्याचे नाही तर इतर राज्यातील ओबीसींवर देखील अन्याय होता कामा नये, असंही सुप्रिया सुळे म्हणाल्या आहेत.

ओबीसींना आरक्षण देण्याचा निर्णय महाराष्ट्रात एकमताने झाला आहे. मला वाटतंय की ओबीसींवर अन्याय होऊ नये म्हणून केंद्राने आम्हाला मदत करावी. त्यामुळे महाराष्ट्रासह इतर राज्यांवर देखील अन्याय होणार नाही, असंही सुळे म्हणाल्या आहेत.

दरम्यान, ओबीसी आरक्षणावरून आता राज्यात वातावरण चांगलंच पेटताना दिसत आहे. भाजप नेते आता महाविकास आघाडीवर निश्काळीपणाचा आरोप करत आहे. तर काँग्रेसने यावर भाजपला जबाबदार धरत टीका केली आहे. त्यामुळे आता येत्या काळात या मुद्द्यावरून राजकारण पेटण्याची शक्यता आहे.

थोडक्यात बातम्या-

आदित्य ठाकरेंचा Dream Project वादात; भाजपने केले भ्रष्टाचाराचे गंभीर आरोप

हर्षवर्धन पाटील लेकीसह राज ठाकरेंच्या भेटीला; समोर आलं ‘हे’ कारण

omicron हवेतून पसरतोय?; अभ्यासातून धक्कादायक माहिती समोर

‘…हे कदाचित कोरोना संपल्याचं लक्षण असेल’; आनंद महिंद्रांचं ‘ते’ ट्विट चर्चेत

ओबीसी आरक्षणाबाबत न्यायालयाने दिलेल्या निर्णयावर भुजबळांची प्रतिक्रिया, म्हणाले…

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More