सुप्रिया सुळेंना सातव्यांदा ‘संसद रत्न’ पुरस्कार, 11 पैकी 4 महाराष्ट्राचे खासदार
नवी दिल्ली | चैन्नई येथील प्राईम पॉईंट फाऊंडेशन आणि ई- मॅगझिनतर्फे देण्यात येणाऱ्या संसद रत्न पुरस्काराची यादी जाहीर करण्यात आली आहे. 11 खासदारांना संसद रत्न पुरस्काराने सन्मानित करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. विशेष बाब म्हणजे 11 खासदारांपैकी महाराष्ट्रातील 4 खासदारांना सन्मानित करण्यात आलं आहे.
महाराष्ट्रातील खासदारांमध्ये राष्ट्रवादीच्या सुप्रिया सुळे, फौजिया खान तर भाजपच्या हिना गावित आणि शिवसेनेचे श्रीरंग बारणे यांचा समावेश आहे. 12 वा संसदरत्न सोहळा येत्या 26 फेब्रुवारीला पार पडणार आहे. प्राईम पॉईंट फाऊंडेशनतर्फे लोकसभेमध्ये उत्कृष्ट कामगिरी करणाऱ्या खासदारांना 2010 पासून संसदरत्न पुरस्काराने गौरविण्यात येत आहे.
17 व्या लोकसभेच्या सुरूवातीपासून ते हिवाळी अधिवेशन 2021 पर्यंतच्या एकत्रित कामगिरीच्या आधारे पुरस्कार विजेत्यांची निवड करण्यात आली आहे, असं प्राईम पॉईंट फाऊंडेशनचे संस्थापक अध्यक्ष श्रीनिवासन यांनी सांगितलं आहे. खासदार सुप्रिया सुळे यांनी 1 जून 2019 ते 11 फेब्रुवारी 2022 या कालावधीमध्ये 92 टक्के उपस्थिती लावली आहे.
दरम्यान, राष्ट्रवादीचे खासदार डॉ. अमोल कोल्हे यांनी ट्विट करत सुप्रिया सुळे यांचं अभिनंदन केलं आहे. सुप्रियाताई आक्रमकपणे आणि अभ्यासपुर्ण शैलीत जनतेचे प्रश्न संसदेत मांडत असतात. त्यामुळे चेन्नईच्या प्राईम पाॅईंट फाऊंडेशन व ई मॅगझिनतर्फे दिल्या जाणाऱ्या या पुरस्कारासाठी त्यांची झालेली निवड अचूक आहे, असं अमोल कोल्हे यांनी म्हटलं आहे.
थोडक्यात बातम्या-
आर्यन खानची लवकरच होणार बाॅलिवूडमध्ये एन्ट्री; अॅक्टींग नाही तर ‘हे’ काम करणार
“…तर भाजपच्या नेत्यांना तोंड दाखवायला जागा राहणार नाही”
“शिवसेना-भाजपच्या मैत्रीसाठी संजय राऊतांना भेटणार, महाराष्ट्राच्या भल्यासाठी…”
दिशाच्या आई-वडिलांनी मौन सोडलं, दिशाच्या मृत्यूचं खरं कारण आलं समोर
महाराष्ट्र मास्कफ्री होणार?, उद्धव ठाकरेंनी स्पष्टच सांगितलं
Comments are closed.