बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

“राजकारणच करायचंय तर समोरासमोर करा, बायका मुलांवर हल्ले कशाला?”

नवी दिल्ली | राज्याचे माजी गृहमंत्री अनिल देशमुख (Anil Deshmukh) यांच्यावर भ्रष्टाचाराचे गंभीर आरोप झाल्यानंतर अटक करण्यात आली आहे. त्यावरून राष्ट्रवादीचे नेते आक्रमक झाल्याचं पहायला मिळालं होतं. अशातच आता राष्ट्रवादीच्या खासदार सुप्रिया सुळे (MP Supriya Sule ) यांनी केंद्र सरकारवर कडाडून टीका केली आहे.

राजकारण करायचंच आहे, तर हल्ले समोरासमोर करा, बायका मुलांवर हल्ले कशाला? असा खोचक सवाल करत खासदार सुप्रिया सुळे यांनी उपस्थित केला आहे. सीवीसी विधेयक आणि दिल्ली एस्टॅब्लिशमेंट विधेयकावर बोलत असताना सुप्रिया सुळेंनी ही टीका केली आहे. सीबीआय आणि ईडीचा गैरवापर करत असल्याचं आरोप देखील त्यांनी यावेळी केला आहे.

आम्ही आता भाजपमध्ये आलोय त्यामुळे आता आमच्यावर छापेमारी होत नाही, असं भाजप खासदार भाषणात बोलताना म्हणतात. राष्ट्रवादीचे आमदार अनिल देशमुख यांच्यावर सहा वेळा छापेमारी झाली. मात्र, त्यात त्यांना काहीच मिळालं नाही. त्यामुळे त्यांच्यावर सातव्यांदा छापेमारी झाली, असं सुप्रिया सुळे म्हणाल्या.

दरम्यान, राज्यातील महाविकास आघाडी सरकार पडणार असं भाजपकडून बोलण्यात येतंय. मात्र, महाविकास आघाडी सरकारने दोन वर्ष पुर्ण केली आहेत. हे सरकार  पुर्ण 5 वर्ष टीकणार आणि 25 वर्ष काम करणार, असा विश्वास देखील त्यांनी यावेळी व्यक्त केला आहे.

थोडक्यात बातम्या-

Omicron | मुंबई महापालिका अॅक्शन मोडमध्ये; घेतला ‘हा’ मोठा निर्णय

विककॅटच्या लग्नातील डायमंड रिंगची भलतीच चर्चा; किंमत एकूण व्हाल थक्क

“माझ्या दादाकडे वाकड्या नजरेने बघू नका नाहीतर…”, किशोरी पेडणेकरांना धमकीचं पत्र

Omicronने टेन्शन वाढवलं! आली ‘ही’ धक्कादायक माहिती समोर

जाळ अन् धूर संगच! बॉसला कंटाळून महिलेनं केलं असं काही की…

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More