बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

चार दिवसांपासून खासदार उदयनराजे रुग्णालयात, पुण्यात उपचार सुरु!

पुणे | भाजपचे राज्यसभेचे खासदार उदयनराजे भोसले गेल्या चार दिवसांपासून पुण्यात उपचार घेत असल्याची माहिती समजत आहे. उदयनराजे यांना कोरोना संसर्ग झाला आहे. पुण्यामधील रूबी हॉस्पीटलमध्ये त्यांच्यावर उपचार चालू आहेत.

दिल्लीवरून परतल्यानंतर उदयनराजे भोसले यांना कोरोनाची लागण झाल्याचं समजत आहे. त्यानंतर त्यांना पुण्यामधील रूबी हॉस्पीटलला उपचारासाठी आणण्यात आलं होतं. उदयनराजेंची प्रकृती आता व्यवस्थित असल्याची समजतंय. येत्या दोन दिवसात त्यांना डीस्चार्ज मिळाणार असल्याचं निकटवर्तीयांकडून सांगण्यात आलं आहे.

उदयनराजे यांच्या मातोश्री कल्पनाराजे यांना कोरोनाचा संसर्ग झाला होता. त्यामुळे उदयनराजे अधिवेशन सोडून परतले होते.

दरम्यान, कोरोना काळात दुकाने सुरू करावीत अशी मागणी करण्यासाठी उदयनराजेंनी लोकांची विनाकारण अडवणूक करू नका यासाठी भीकमांगो आंदोलन केलं होतं.

थोडक्यात बातम्या- 

कार प्रेमींसाठी जबरदस्त बातमी, ‘ही’ जबरदस्त गाडी लवकरच लाँच होणार!

“तालिबानने अफगाणिस्तानचा कब्जा घेतला, महाराष्ट्राला जास्त सतर्क रहायला हवं”

अबब… गाड्या विकता की केसावर फुगे??? ‘या’ कंपनीनं एका दिवसात विकल्या 1 लाख गाड्या!

होंडाचा सर्वात मोठा धमाका, सर्वात स्वस्त कार होणार लाँच, फक्त 5 हजार रुपयात!

मोठी बातमी! सुवर्णपदकवीर नीरज चोप्रा रूग्णालयात दाखल, तब्येत पुन्हा बिघडली!

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More