बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

“काळजी करू नका सरकार पडणार नाही, या सरकारला दृष्ट लागू नये”

मुुबंई | शिंदे-फडणवीस सरकारचा शपथविधी होऊन 22 दिवस उलटून गेले. इतकं होऊनही राज्याचा मंत्रीमंडळ विस्तार अजून झालेला नाही. राज्यात चाललेल्या सगळ्या कामांचा आढावा मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री घेत आहेत. यातच मंत्रीमंडळ विस्तारावरून अनेक आरोप केले जात आहेत. हे सरकर लवकर पडेल, असं भाकित नेत्यांकडून व्यक्त केलं जात आहे. यावर खासदार उद्यनराजे भोसले यांनी आपलं मत मांडलं.

आम्ही सर्व फडणवीसांवर प्रेम करतो. उपमुख्यमंत्री यांच्या वाढदिवसादिवशी ते आम्हाला भेटले यामुळे आम्हाला बंर वाटलंं. त्यांना शुभेच्छा द्यायची संधी मिळाली. मंत्रीमंडळाचा विस्तार 3-4 दिवसांत होईल, असंही ते म्हणाले. काळजी करू नका, हे सरकार कोसळणार नाही, या सरकारला दृष्ट लागू नये, असंही ते पुढे म्हणाले.

हा मंत्रीमंडळ विस्तार 19 तारखेला होणार होता मात्र कोर्टात सुणावणी होणार असल्याने तो पुढे ढकलला होता. त्यानंतर आता 23 जुलैला भाजपची प्रदेश कार्यकारणीची बैठक होणार आहे. 24 जुलैला आदिवासी पांड्यावर भाजपकडून जल्लोष करण्यात येणार आहे. 25 जुलैला राष्ट्रपती पदाची शपशविधी होईल. त्यानंतर आता मंत्रीमंडळविस्तार व्हायला 26-27 तारीख उजाडेल. 12 जणांचा शपथविधी पहिल्या टप्प्यात होणार असल्याची माहिती आहे.

राज्यातील सत्तासंघर्ष वाढतच चालला आहे. आरोप-प्रत्यारोपासह हा राजकीय वाद आता कोर्टात जाऊन पोहोचला आहे. खरी शिवसेना कोणाची याचाही निकाल लागणं अजून बाकी आहे. 1 आ‌ॅगस्टला याचा निकाल लागेल.

थोडक्यात बातम्या

“डिलिव्हरीचा मुहूर्त ठरलेला दिसत नाही, मंत्र्यांचा पाळणा कधी हलणार?”

नीरव मोदीला ईडीचा जोर का झटका; केली ‘ही’ मोठी कारवाई

शिंदे गटात सहभागी झालेल्या खासदाराचा मोठा गौप्यस्फोट, म्हणाले…

“शिवसेना आमदार, खासदारांनी रशिया- युक्रेन युद्धाकडून शिकावं”

सर्वोत्कृष्ट मराठी सिनेमाचा राष्ट्रीय पुरस्कार ‘गोष्ट एका पैठणीची’ला जाहीर

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More