रत्नागिरी | शिवसेनेच्या दसरा मेळाव्यात मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आपल्या भाषणात विरोधकांवर जोरदार टीका केली. त्यानंतर त्यांच्यावरही जोरदारही टीका झाली. यामध्ये भाजप नेते नारायण राणे यांनी ठाकरेंवर निशाणा साधत उद्धव ठाकरे मुख्यमंत्रिपदाला लायक नसल्याचं म्हटलं होतं. याच पार्श्वभूमीवर शिवसेना खासदार विनायक राऊत यांनी राणेंना प्रत्युत्तर दिलं आहे.
पावसाळा संपला असला तरी या बेडकांची डरावडराव गिरी संपलेली नाही. पण त्यांच्या डराव-डराव गिरीला कोणी घाबरत नाही. येत्या काही काळात जनता राणेंना त्यांची जागा दाखवून देईन, असं विनायक राऊत यांनी म्हटलं आहे.
नारायण राणे तुम्हाला माझा एकच सल्ला आहे. तुम्ही मुख्यमंत्री होतात. मुख्यमंत्रिपदावर असलेल्या व्यक्तीला तुम्ही उद्देशून वापरलेले शब्द न शोभणारे आहेत, असंही विनायक राऊत यांनी म्हटलं आहे.
दरम्यान, मी शिवसेनेत होतो, अनेक पदं भुषवली. बाळासाहेब ठाकरे यांनी अनेक पदं दिलं. मी बेडूक नव्हतो. हे बेडूक आहेत म्हणून त्यांना मुख्यमंत्री केलं नाही. बाळासाहेब असते तर त्यांना मुख्यमंत्री केलं नसतं, असं नारायण राणे म्हणाले होते.
महत्वाच्या बातम्या-
“मराठा आरक्षणाची सुनावणी चार आठवडे पुढे ढकलण्यात आली याला सरकार जबाबदार”
राष्ट्रवादी खासदार सुनिल तटकरे यांना कोरोनाची लागण
‘कोरोना गो’ म्हणणाऱ्या केंद्रीय मंत्री रामदास आठवले यांना कोरोनाची लागण
मराठा आरक्षण सुनावणी चार आठवडे पुढे ढकलली
गुन्हे दाखल करण्याचं सत्र आता…; पंकजा मुंडेंनी व्यक्त केला संताप
Comments are closed.