Top News महाराष्ट्र मुंबई

धक्कादायक! मुंबईतील हाॅटेलमध्ये खासदाराचा मृतदेह आढळल्याने खळबळ

@ShriMohanbhaiDelkar

मुंबई | केंद्र शासित प्रदेश दादरा नगर हवेलीतील खासदार मोहनभाई देलकर यांचा मृतहेद सापडल्याचा धक्कादायक घटना समोर आली आहे. मुंबईतील मारिन ड्राईव्ह येथील सी ग्रीन साऊथ या हॉटेलमध्ये त्यांचा मृतदेह आढळला आहे. मोहनभाई देलकरांचा मृतदेह सापडला मात्र त्यांनी आत्महत्या केली की त्यांची हत्या करण्यात आली?, याबाबत कोणतीही माहिती अद्याप समजू शकलेली नाही. मात्र त्यांनी आत्महत्या केली असल्याचं बोललं जात आहे.

मोहनभाई डेलकर हे अपक्ष असून त्यांचं वय 58 आहे. मुंबई पोलिसांना मोहनभाई डेलकरांच्या मृतदेहाजवळ सुसाईड नोट सापडल्याची माहिती समजत आहे. सध्या त्यांचा मृतदेह शवविच्छदनासाठी पाठवण्यात आला असून पोलीस या प्रकणाचा अधिक तपास करत आहेत. डेलकरांनी लिहिलेली सुसाईड नोट ही गुजराती भाषेत असल्याचं समजतंय.

या चिठ्ठीमध्ये काही बड्या नेत्यांची नाव असल्याची शक्यता वर्तवली जात आहे. ही सुसाईड नोट सध्या पोलिसांच्या ताब्यात आहे. डेलकरांच्या पश्चात पत्नी कालाबेन देलकर आणि दोन मुलं असून त्यातील एकाचं नाव अभिनव आणि दिविता असं आहे. देलकरांच्या अशा अचानक जाण्याने त्यांच्या घरच्यांना मोठा धक्का बसला आहे.

दरम्यान, 1989 मध्ये मोहनभाई देलकर यांनी पहिल्यांदा लोकसभा निवडणुक लढवली होती. त्यानंतर त्यांनी 2009 मध्ये काँग्रेसमध्ये प्रवेश केला होता. यंदाची लोकसभा निवडणुक ही त्यांनी अपक्ष म्हणून लढवली होती.

थोडक्यात बातम्या-

अर्जुन तेंडुलकरला ट्रोल करणाऱ्यांना फरहान अख्तरनं सुनावलं; म्हणाला…

अर्थसंकल्पीय अधिवेशन होणार की नाही, एकनाथ शिंदेंची सूचक प्रतिक्रिया

“मोदी सरकार जनतेचे खिसे रिकामे करुन त्यांच्या मित्रांना मोफत देण्याचं काम करत आहे “

समीर गायकवाडचा अखेरचा ‘तो’ व्हिडीओ होतोय व्हायरल; चाहत्यांना म्हणाला….

जोपर्यंत उद्धव ठाकरे मुख्यमंत्री आहेत तोपर्यंत महाराष्ट्रातून कोरोना जाणार नाही – निलेश राणे

मेलवर बातम्या मिळवा

खालील रिकाम्या बॉक्समध्ये तुमचा ई-मेल आयडी टाका आणि Subscribe म्हणा. आमच्या बातम्या तुम्हाला ई-मेलवर मिळतील.

ताज्या बातम्या