बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

मोठी बातमी! शिंदे गटातल्या ‘इतक्या’ खासदारांना लॉटरी लागणार

मुंबई | शिंदे सरकारचा मंत्रिमंडळ विस्तार झाला खरा पण आता सगळ्यांचं लक्ष लागलंय ते खातेवाटपाकडे. शिदेंच्या मंत्रिमंडळात कोणाला स्थान मिळालं आणि कोणाला डावललं याची खूप चर्चा रंगली. यावरून अनेकांचं नाराजीनाट्य पण पाहायला मिळालं. शिंदेंच्या गटातले काही आमदार नाराज असल्याच्या बातम्या पण समोर आल्या. आमदारांची नाराजी दूर करण्याचे प्रयत्न सुरू असताना शिंदे गटातल्या खासदारांना मात्र लॉटरी लागलीये.

एनडीएचा एक घटक पक्ष असलेल्या शिवसेनेला केंद्रात एक मंत्रिपद होतं. पण 2019ला राज्यात सेना भाजपची युती तुटली आणि सेनेच्या खासदाराने मंत्रिपदावर पाणी सोडलं.

पण आता महाराष्ट्रातील समीकरणं बदललीयेत. महाविकास आघाडीचं सरकार जाऊन राज्यात आता शिंदे गट आणि भाजचं सरकार आलंय. एकनाथ शिंदेंसोबत आमदारांनी बंड केलंच पण त्यानंतर शिवसेनेचे 12 खासदार पण शिंदे गटात येऊन सामील झाले.

शिंदेंच्या गटात आलेल्या खासदारांनी आम्हीच मूळ शिवसेना असून एनडीएचा घटक पक्ष असल्याचा दावा केलाय. याबाबतचे पत्रही लोकसभा अध्यक्षांना देण्यात आले आहे. शिवसेनेत बंड करून शिंदे गटाला पाठिंबा दिलेल्या खासदारांना आता मात्र लॉट्री लागताना दिसतेय.

12 खासदारांपैकी 2 खासदारांना केंद्रात मंत्रिपद मिळण्याची शक्यताय. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या मंत्रिमंडळाचा विस्तार येत्या काही काळात अपेक्षित आहे. यात शिंदे गटातल्या दोन खासदारांचा मंत्रिपदाची लॉटरी लागण्याची दाट शक्यता आहे.

दक्षिण मध्य मुंबईचे खासदार राहुल शेवाळे यांचं नाव या यादीत सध्या आघाडीवरय. एकनाथ शिंदे गटाला पहिल्यांदा पाठिंबा जाहीर करणारे खासदार हे राहुल शेवाळे होते. त्यामुळे राहुल शेवाळेंना केंद्रात एक मंत्रिपद मिळण्याची दाट शक्यताय.

तर  मंत्रिपदासाठी दुसरं नाव चर्चेत आहे ते म्हणजे विदर्भातले बुलडाण्याचे खासदार प्रतापराव जाधवांचं. प्रतापराव जाधव यांनाही केंद्रात मंत्रिपद दिलं जाईल, अशी शक्यता वर्तवण्यात येतेय.

राज्य मंत्रिमंडळातल्या विस्तारात शिंदे गटातल्या मुंबई आणि विदर्भातील जास्त आमदारांना संधी देण्यात आली नसल्यानं नाराजीचा सूर आहे. त्यामुळंच प्रादेशिक समतोल राखण्याच्या दृष्टीकोनातून राहुल शेवाळे आणि प्रतापराव जाधवांना केंद्रात मंत्रिपद मिळण्याची शक्यता आहे.

प्रतापराव जाधव, राहुल शेवाळे, हेमंत गोडसे, राजेंद्र गावित, धैर्यशील माने, संजय मंडलिक, सदाशीव लोखंडे, भावना गवळी, श्रीरंग बारणे, श्रीकांत शिंदे, कृपाल तुमाने, हेमंत पाटील हे शिवसेनेतून शिंदे गटात आलेले खासदार आहेत.

पण या 12 खासदारांपैकी प्रतापराव जाधव आणि राहुल शेवाळेंचं नाव केंद्रात मंत्रिपद मिळणाऱ्यांच्या यादीत आघाडीवरय.

भाजपसोबत युती केल्यानंतर शिंदे गटाला राज्यात मुख्यमंत्रिपद मिळालंच, पण आता केंद्रात पण सत्तेत वाटा मिळणार आहे.  शिंदे गटाच्या वाट्याला एक केंद्रीय मंत्रिपद तर एक राज्यमंत्री पद येण्याची शक्यता आहे.

केंद्रात मंत्रिपद मिळणार असल्याची चर्चा सुरु झाल्यानंतर इतर खासदार सुद्धा रेसमध्ये असल्याचं दिसत आहे. आपल्याला मंत्रिपद मिळावं यासाठी काही खासदारांनी मोर्चेबांधणी केल्याचं देखील समजत आहे, मात्र भाजपची पद्धत पाहता ठरलेल्या नावांवरच शिक्कामोर्तब होऊ शकतं असं तरी सध्या दिसत आहे. आता केंद्रात नेमकं कुणाला मंत्रिपद मिळतंय, हे येणारा काळच सांगेल.

थोडक्यात बातम्या- 

न्यूझीलंडचा माजी कर्णधार रॉस टेलरचा अत्यंत धक्कादायक खुलासा!

‘…म्हणून बावनकुळेंना विधानसभेचं तिकिट नाकारलं’; अखेर फडणवीसांनी कारण सांगितलं

मागील अडीच वर्षात सिलेंडरच्या दरात ‘इतक्या’ टक्क्यांनी वाढ; किंमत जाणून धक्का बसेल

नरेंद्र मोदींना पर्याय म्हणून ‘या’ चार नावांची देशाच्या राजकारणात चर्चा!

“काहींना वाटतं की शिवसेना उघड्यावर पडलेली वस्तू आहे, जी कोणीही उचलून…”

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More