देश

खासदारांना आता जेवणाचे पूर्ण पैसे भरावे लागणार; केंद्र सरकारने घेतला ‘हा’ मोठा निर्णय

नवी दिल्ली | खासदारांना यापुढे संसद भवन संकुलाच्या कॅन्टीनमध्ये अनुदानित जेवण मिळणार नाही. लोकसभा अध्यक्ष ओम बिर्ला यांनी याबाबत माहिती दिली आहे.

खासदारांना आणि इतरांना संसदेतील कॅन्टीनच्या जेवणावर दिलं जाणारं अनुदान बंद करण्यात आलं आहे, असं ओम बिर्ला यांनी सांगितलं आहे.

जेवणाच्या एका थाळीची किंमत 35 रुपये होती. केंद्र सरकारडून सबसिडी दिली जात असल्यामुळे इतक्या कमी रकमेत जेवण दिलं जातं होतं. मात्र खासदारांच्या जेवणावरील सबसिडी बंद केल्यामुळे केंद्र सरकारचे 8 कोटी रुपये वाचणार असल्याचं कळतंय.

दरम्यान, संसेदेचं बजेट अधिवेशन 29 जानेवारीपासून सुरु होणार आहे. 29 जानेवारीला सकाळच्या सत्रात राज्यसभेचं कामकाज सुरु होईल तर दुपारच्या सत्रात लोकसभेचं कामकाज सुरु असेल, अशी माहिती ओम बिर्ला यांनी दिली.

थोडक्यात बातम्या-

”जे.पी. नड्डा आहेत कोण? त्यांच्या प्रश्नांची उत्तरं मी का देऊ”

‘मी माझ्या आयुष्यात कधीच खोटं बोललो नाही, त्यामुळे…’; अण्णा हजारेंचं मोदींना पत्र

“राज्यात महाविकासआघाडीच्या तुलनेत भाजप 20 टक्के देखील नाही”

भाजप आमदार राम कदम पोलिसांच्या ताब्यात!

“पाटील हा श्रीनिवास पाटलांसारखा रंगेल असावा, पण धनंजय मुंडेंसारखा नसावा”

मेलवर बातम्या मिळवा

खालील रिकाम्या बॉक्समध्ये तुमचा ई-मेल आयडी टाका आणि Subscribe म्हणा. आमच्या बातम्या तुम्हाला ई-मेलवर मिळतील.

ताज्या बातम्या