मुंबई | महाराष्ट्र राज्य सेवा आयोगाने (Maharashtra Public Service Commission) मेडिकल अधिकारी पदांसाठी भरती काढली आहे. त्यासाठी त्यांनी अर्ज मागवले आहेत. पात्र आणि इच्छुक उमेदवार आयोगाच्या अधिकृत संकेतस्थळावर (www.mpsconline.gov.in) अर्ज करु शकतात. अर्ज करण्याची अंतिम तारीख 17 ऑगस्ट 2022 असून त्यापूर्वी अर्ज करण्याची मुदत आहे.
या भरतीत एकूण 427 पदांसाठी अर्ज मागवण्यात आले आहेत. या 427 पदांसाठी भरती होणार आहे. महाराष्ट्राच्या सरकारी मेडिकल महाविद्यालये आणि रुग्णालयात या विद्यार्थ्य़ांची वर्णी लागणार आहे. पात्र उमेदवार MPSC Recruitment 2022 Notification या ठिकाणी अधिक माहिती मिळवू शकतात. या भरतीसाठी एमबीबीएस (MBBS) उत्तीर्ण विद्यार्थी अर्ज करु शकतात.
यासाठी काही वयोमर्यादा देखील आहेत. अर्जदार उमेदवार हा 1 ऑगस्ट 2022 रोजी वय वर्ष 18 ते 38 मध्ये असायला हवा. तसेच आरक्षण कोट्यात येणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी वयोमर्यादा वेगळी आहे. ती आपण आयोगोच्या संकेतस्थळावर जाऊन मिळवू शकता. अर्जासाठी रुपये 394 शुल्क भरावे लागणार आहे. तसेच आरक्षण वर्गातील उमेदवारांसाठी हे शुल्क 294 रुपये ठेवण्यात आले आहेत.
पदांवर उमेदवारांची निवड मुलाखतींतून (Interview) केली जाणार आहे. जर अर्जदारांची संख्या जास्त प्रमाणात असेल, तर विद्यार्थ्यांना शॉर्टलिस्ट करण्यासाठी आयोग स्क्रिनिंग टेस्ट (Screening Text) घेण्याची शक्यता आहे.
थोडक्यात बातम्या –
राज्यातील ‘या’ जिल्ह्यांना पाऊस झोडपून काढणार, वाचा हवामान खात्याचा अंदाज
“साहेब जैसा जैसा बोले हा तैसा तैसा चाले म्हणून यांचे आस्तित्व बुडाले”
संसदेबाहेरील काँग्रेसच्या आंदोलनावर नरेंद्र मोदींची टीका, म्हणाले…
नक्की कुठे चुकलं?, उद्धव ठाकरे म्हणाले ‘गुन्हा माझाय, चूक माझी आहे’
“मी बरा होऊ नये म्हणून काहींनी देव पाण्यात ठेवले, तेच पक्ष बुडवायला निघालेत”
Comments are closed.