मुुंबई | MPSC प्रक्रियेवर उच्च न्यायालयाने लावलेली स्थगिती महाराष्ट्र प्रशासकीय न्यायाधिकरणाने (मॅट) कायम ठेवली आहे. उच्च न्यायालयाच्या आदेशाप्रमाणे फक्त RTOचे निकाल जाहीर करण्यास मॅटने परवानगी दिलीय.
MPSC समांतर आरक्षणासंदर्भात अजय मुंडे यांनी याचिका दाखल केली होती. राज्य सरकारने ही याचिका निकाली काढण्याची विनंती उच्च न्यायालयाला केली होती, मात्र मॅटने 2 आठवड्यात निर्णय घ्यावा, असे निर्देश उच्च न्यायालयाने दिले होते.
न्यायमूर्ती शंतनू केमकर आणि न्यायमूर्ती एम. एस. कर्णिक यांच्या खंडपीठापुढे यावर सुनावणी झाली. त्यांनी MPSC वरील स्थगिती कायम ठेवली.
Comments are closed.