बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

तारीख पे तारीख… एमपीएससीच्या परीक्षा पुन्हा पुढे ढकलल्या

मुंबई | महाराष्ट्र राज्यसेवा आयोगामार्फत घेण्यात येणारी ‘राज्यसेवा पुर्व परीक्षा’ पुन्हा पुढे ढकलण्यात आली आहे. ही परीक्षा रविवार, 14 मार्च 2021 रोजी घेण्यात येणार होती. महाराष्ट्र लोकसेवा आयोगाने यावर अधिकृत पत्रक काढूून माहिती दिली आहे. तर सुधारीत दिनांक यथावकाश जाहीर करण्यात येईल अशी माहिती महाराष्ट्र राज्यसेवा आयोगाने दिली आहे.

10 मार्च रोजी शासनाच्या आपत्ती व्यवस्थापन प्रभागाच्या, मदत व पुनर्वसन विभागाने आयोगाला पत्र लिहले होते. यामध्ये परीक्षा पुढे ढकल्यात यावे अशी सुचना केली आहे. राज्यामध्ये कोरोना विषाणूचा प्रभाव वाढत असल्याने त्यावर प्रतिबंधात्मक उपाय म्हणून वेगवेगळ्या जिल्हांनी निर्बंध लावले आहेत. या पार्श्वभूमीवर राज्य सेवा परीक्षा घेणे योग्य नसल्याने परीक्षा पुढे ढकलण्यात यावी. असे आपत्ती व्यवस्थापन विभागानं म्हटलं आहे.

तर याआधी मराठा आरक्षणाच्या मुद्यावरून आणि त्यानंतर कोरोनाच्या पार्श्वभूमीवर राज्यसेवा परीक्षा पुढं ढकलण्यात आली होती. त्यामुळे परीक्षा देणाऱ्या विद्यार्थ्यांमध्ये संतापाचं वातावरणचे आहे.

दरम्यान, प्रशासनाच्या या निर्णयानंतर पुण्याच्या नवी पेठेत विद्यार्थ्यांनीरस्त्यावर उतरून आंदोलन करत आहे. तर काही विद्यार्थ्यांना पोलिसांनी ताब्यात घेतलं आहे.

थोडक्यात बातम्या-

…अन्यथा तुझं करिअर खराब करेल, अशी धमकी देत त्यानं बलात्कार केला!

कसला अफलातून कॅच!!! श्रीलंकन खेळाडूचा कायरन पोलार्डने घेतला खतरनाक कॅच, पाहा व्हिडिओ

‘या’ कारणानमुळे तृणमूल काँग्रेसला बसू शकतो मोठा फटका!

मोठी बातमी! मुख्यमंत्र्यांनी दिले लाॅकडाऊनचे संकेत, दोन दिवसात होणार मोठा निर्णय!

नरेंद्र मोदींनाही मोह आवरला नाही; ‘तैमूर का जीजा’ हँडलवरील व्हिडीओ केला रिट्विट

 

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More