बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

एमपीएससीच्या मुख्य परीक्षेची तारीख ठरली; ‘या’ 6 केंद्रांवर होणार परीक्षा

मुंबई | गेल्या अनेक महिन्यांपासून महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत घेण्यात येणाऱ्या परीक्षा लांबणीवर पडल्या होत्या. तसेच एमपीएससीतून पदे मिळवलेल्या बऱ्याच विद्यार्थ्यांना अद्याप नियुक्त्या देखील देण्यात आल्या नाहीत. यामुळे एमपीएससीचे विद्यार्थी पुन्हा आक्रमक झालेले पहायला मिळत होते. त्यातच आता एमपीएससी उमेदवारांना आयोगाने दिलासा दिला आहे.

राज्यसेवा मुख्य परीक्षा 2020 ची तारीख जाहीर झाली असून  4, 5 आणि 6 डिसेंबर 2021 रोजी मुख्य परीक्षा होणार असल्याचं राज्य लोकसेवा आयोगाने सांगितलं आहे. अमरावती, औरंगाबाद, मुंबई, नागपूर, नाशिक आणि पुणे या जिल्हा केंद्रांवर परीक्षा घेण्यात येणार असल्याचं आयोगानं स्पष्ट केलंय.

काही दिवसांपूर्वी पुर्व परीक्षेचा निकाल जाहीर करण्यात आला होता. त्यानंतर आता मुख्य परीक्षेसाठी अर्ज सादर करण्याचा कालावधी दिनांक 14 सप्टेंबर 2021 पासून ते 28 सप्टेंबर 2021 पर्यंत असणार आहे. उद्या दुपारी 2 वाजल्यापासून अर्ज स्विकारण्यास सुरूवात होणार आहे.

दरम्यान, महाराष्ट्र स्थापत्य अभियांत्रिकी सेवा मुख्य परीक्षा 2020, दिनांक 18 डिसेंबर, 2021 रोजी होणार आहे. त्यासाठी मुंबई, पुणे, नाशिक, औरंगाबाद, अमरावती व नागपूर या जिल्हा केंद्रावर घेण्यात येणार असल्याचं आयोगाने सांगितलं आहे.

थोडक्यात बातम्या-

“दुसऱ्यांच्या मुलांकडे बोट दाखवण्याआधी आपला मुलगा काय करतो ते पहावं”

“स्वत:ला अग्रस्थानी ठेवून नवा इतिहास लिहिण्याचा भाजपचा प्रयत्न”

राज्यातील ‘या’ जिल्ह्यांना पाऊस झोडपणार; हवामान खात्याकडून सतर्कतेचा इशारा

माजी केंद्रीय मंत्री आणि काँग्रेस नेते ऑस्कर फर्नांडिस यांचं निधन

पाच जिल्हा परिषद निवडणुकीचं बिगुल वाजलं! ‘या’ तारखेला होणार मतदान

Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More