बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

PSI पूर्व परीक्षेचा निकाल जाहीर; आता मुख्य परीक्षा ‘या’ तारखेला होणार

मुंबई | एमपीएससी विद्यार्थ्यांची (MPSC Students) प्रतिक्षा अखेर संपली आहे. पूर्व परीक्षेचा निकाल अखेर जाहीर झाल्याने विद्यार्थ्यांना मोठा दिलासा मिळाला आहे. एमपीएससी (MPSC) दुय्यम सेवा अराजपत्रित गट ब 2020 PSI पूर्व परिक्षेचा निकाल जाहीर झाल्याने विद्यार्थ्यांमध्ये उत्साहाचं वातावरण पाहायला मिळत आहे.

4 सप्टेंबर 2021 मध्ये ही परीक्षा घेण्यात आली होती. एमपीएससीच्या अधिकृत संकेतस्थळावरून हा निकाल जाहीर करण्यात आला आहे. आता उत्तीर्ण विद्यार्थ्यांचा मुख्य परीक्षा देण्याचा रस्ता आता मोकळा झाला आहे. पूर्व परीक्षेच्या निकालासोबतच मुख्य परीक्षेची तारीख देखील जाहीर झाल्याने विद्यार्थ्यांना आणखी एक आनंदाची बातमी मिळाली आहे.

नवीन वर्षाच्या सुरूवातीलाच अर्थात 1 जानेवारी 2022 रोजी उत्तीर्ण विद्यार्थ्यांना मुख्य परीक्षा देता येणार आहे. पूर्व परीक्षेच्या निकालासोबत मुख्य परीक्षेच्या (MPSC Main Examination) तारखा जाहीर केल्याने विद्यार्थ्यांना वेळेचं नियोजन करायला मदत मिळाली आहे.

दरम्यान, कोरोनाच्या दुसऱ्या लाटेच्या पार्श्वभूमीवर अनेकदा परीक्षा रद्द करण्यात आल्या होत्या. सतत परीक्षा रद्द झाल्याने विद्यार्थ्यांमध्ये संतापाची लाट उसळली होती. त्यानंतर यावर तोडगा काढत पूर्व परीक्षा घेण्यात आली व आता मुख्य परीक्षेच्या तारखाही जाहीर करण्यात आल्या आहेत.

थोडक्यात बातम्या-

‘मिस यु आई’ म्हणत एअरपोर्टवर गेला अन् आईनी चपलेने धुतलं; पाहा मजेशीर व्हिडीओ

“अनिल परबांची तेवढी ताकद नाही, मंत्री म्हणून जी संविधानिक उंची लागते ती…”

“तेव्हा मला माझीच लाज वाटली, कोणीतरी कानाखाली मारल्यासारखं वाटलं”

Omicron मुळे तिसरी लाट येणार?, आली ‘ही’ धक्कादायक माहिती समोर

चक्रीवादळाचा धोका! ‘या’ तीन राज्यांना अलर्ट जारी, रेल्वे गाड्या देखील रद्द

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More