बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

महाराष्ट्र वनसेवा मुख्य परीक्षेचा निकाल जाहीर! अहमदनगरचा वैभव दिघे राज्यात प्रथम

मुंबई | महाराष्ट्र लोकसेवा आयोगाने राज्यसेवा परीक्षा 2019 चा अंतिम सुधारीत निकाल 28 सप्टेंबर रोजी जाहीर करण्यात आला. त्यानंतर आता महाराष्ट्र वनसेवा मुख्य परीक्षा 2019 चाही निकाल जाहीर करण्यात आला आहे. या परीक्षेमध्ये अहमदनगरचा वैभव दिघे राज्यात प्रथम आला आहे. तर पुणे जिल्ह्यातील पूजा पानसरे हिने मुलींमध्ये बाजी मारली आहे.

महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत सहायक वन सरंक्षक, गट-अ तसेच वनक्षेत्रपाल गट-ब या संवर्गातील एकूण 100 पदांसाठी परीक्षा घेण्यात आली होती. त्यामधून महाराष्ट्र वनसेवा मुख्य परीक्षा 2019 चा निकाल जाहीर झाला आहे.

सर्वाेच्च न्यायालयाच्या निर्णयानुसार काही निकाल राखून ठेवला आहे. वनक्षेत्रपाल पदाकरीता खेळाडूंसाठी आरक्षित असलेल्या 4 पदांचा तसेच अन्य तीन पदांचा निकाल प्रशासकिय कारणास्तव राखून ठेवण्यात आला आहे. यामध्ये अन्य एका उमेदवाराचा निकाल देखील राखून ठेवला आहे. त्यामुळे या पदांची यादी तसेच निवडण्यात येणाऱ्या उमेदवारांची नावे नंतर जाहीर करण्यात येतील.

दरम्यान, राज्य लोकसेवा आयोगाचा निकाल आयोगाच्या संकेतस्थळावर उमेदवारांसाठी आयोगाने उफलब्ध करून देण्यात आला आहे. एमपीएससीने 413 पदांचा निकाल जाहीर केल्यामुळे विद्यार्थी समाधानी झाले आहेत. कारण गेल्या दोन वर्षापासून या निकालाची वाट विद्यार्थी करत होते.

थोडक्यात बातम्या-

“चित्रा वाघ यांना ‘मल्टिपल पर्सनॅलिटी डिसऑर्डर’ची लक्षणं”

पुणे कोरोनामुक्तीच्या वाटेवर, वाचा आजची ताजी आकडेवारी

“मला पुन्हा नजरकैदेत ठेवलंय, मला बाहेर पडू दिलं जात नाही”

नेताजी पडले! भर कार्यक्रमात भाजप नेता स्टेजवरून कोसळला; पाहा व्हिडीओ

पुण्यात साकारला जातोय शरद पवारांचा पुतळा; सुप्रिया सुळेंकडून तोंडभरून कौतूक

Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More