बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

जिद्दीला सलाम! शेतकऱ्याची लेक बनली तहसीलदार तर जावई सीमेवर करतोय देश सेवा

बुलडाणा | नुकत्याच जाहीर झालेल्या महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या परीक्षेत उत्तीर्ण होऊन शेतकरी कुटुंबात जन्मलेल्या इंद्रायणी गोमासे यांनी तहसीलदार पदाला गवसणी घातली आहे.

शिकून काय करायचं, घरचं तर सांभाळावं लागतं, हा मुलींकडे पाहण्याचा दृष्टीकोण आहे. पण लग्न झाल्यावरही इंद्रायणी यांनी शिक्षण पूर्ण करून यशाचं शिखर गाठलं आहे.

इंद्रायणी यांच्या लग्नानंतर पती सीआरपीएफमध्ये दाखल झाले. ते सध्या छतीसगड येथील बस्तर येथे देशाची सेवा करत आहेत. बाकी परिवार शेतकरी असल्यावरही, सासरच्यांनी त्यांचा शिक्षणाला विरोध न करता शिक्षण सुरूच ठेवलं.

इंद्रायणी यांनी स्पर्धा परीक्षेच्या खासगी शिकवण्यातून स्वतः अभ्यास करून राज्य सेवा आयोगाची परीक्षा दिली. यामध्ये उत्तीर्ण होऊन ओबीसी या प्रवर्गातून मुलींमध्ये दुसरा क्रमांक पटकावून आता त्या तहसीलदार झाल्या आहेत.

ट्रेंडिंग बातम्या-

“…तेव्हा फडणवीसांच्या बंगल्यात थांबून थोरात काय करत होते?”

चीन भारतावर सायबर हल्ला करण्याच्या तयारीत, अशी करा स्वतःची सुरक्षा!

महत्वाच्या बातम्या-

नागपूर महापालिकेच्या सभेत गोंधळ, तुकाराम मुंढे चिडून सभागृहाबाहेर निघून गेले

कोरोनामुळे जगाने योगाला पूर्वीपेक्षा अधिक गांभीर्यानं घेतलं- नरेंद्र मोदी

“घरात घुसून मारू म्हणत सत्तेत आलेली व्यक्ती म्हणते, घरात कुणी घुसलंच नाही”

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More