महाराष्ट्र मुंबई

अखेर ‘एमपीएससी’कडून परीक्षांचं सुधारित वेळापत्रक जाहीर

मुंबई | एमपीएससीच्या परीक्षा पुढे ढकलण्याचा निर्णय जाहीर करण्यात आला होता. त्यावर आयोगाने संकेतस्थळावर स्वतंत्रपणे परीक्षांचं वेळापत्रक जाहीर केलं जाईल, असं जाहीर केलं होतं.

आज अखेर आयोगाने परीक्षांच्या तारखा जाहीर केल्याची घोषणा केली आहे. महाराष्ट्र राज्य लोकसेवा आयोगाकडून राज्यसेवा पूर्व परीक्षा – 2020, दुय्यम सेवा अराजपत्रित गट ब संयुक्त पूर्व परीक्षा-2020 व महाराष्ट्र अभियांत्रिकी सेवा पूर्व परीक्षा-2020 या तिन्ही परीक्षांचं सुधारित वेळापत्रक जाहीर करण्यात आलं आहे.

राज्यसेवा पूर्व परीक्षा – 11 ऑक्टोबर 2020, दुय्यम सेवा अराजपत्रित गट ब संयुक्त पूर्व परीक्षा-22 नोव्हेंबर 2020 आणि महाराष्ट्र अभियांत्रिकी सेवा पूर्व परीक्षा – 1 नोव्हेंबर 2020 रोजी होणार आहेत.

दरम्यान, कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्याच्या अनुषंगाने तसेच उमेदवार आणि परीक्षा आयोजनातील सर्व कर्मचारी यांच्या सुरक्षेसाठी सर्व उपाययोजना करण्यात येत आहेत, असं आयोगाने सांगितलंय.

महत्वाच्या बातम्या-

‘मला महाराष्ट्र आवडतो’; कंगणा राणावतचं मराठीत ट्विट

“छत्रपतींच्या नावावर उघडपणे शिविगाळ करणं हा महाराजांचा अपमान आहे”

सरकार देशातील सर्व पेट्रोल पंपावर लवकरच चार्जिंग स्टेशन उभारण्याच्या विचारात…!

आचार्य अत्रेंच्या कन्या प्रसिद्ध लेखिका मीना देशपांडे यांचं निधन

“महाराष्ट्र जितका शिवसेना, काँग्रेस, राष्ट्रवादीचा आहे तितकाच तो भाजपचाही असायलाच हवा”

मेलवर बातम्या मिळवा

खालील रिकाम्या बॉक्समध्ये तुमचा ई-मेल आयडी टाका आणि Subscribe म्हणा. आमच्या बातम्या तुम्हाला ई-मेलवर मिळतील.

ताज्या बातम्या