एमपीएससी परीक्षा पुढे ढकलली! आता कधी होणार?

MPSC l एमपीएससी परीक्षांसंदर्भात एक महत्वाची अपडेट्स आली आहे. आयोगाने IBPS परीक्षा आणि MPSC ची राज्य सेवा संयुक्त पूर्व परीक्षा या दोनही परीक्षा एकाच दिवशी ठेवण्यात आल्या होत्या. मात्र आयोगाच्या या निर्णयाविरोधात विद्येच माहेरघर असलेल्या पुण्यात एमपीएससीच्या विद्यार्थ्यांकडून आंदोलनाला मोठे यश आलं आहे.

MPSC l परीक्षा पुढे ढकलली :

यासंदर्भात एमपीएससीने आज बैठकीत परीक्षा पुढे ढकलण्याचा मोठा निर्णय घेण्यात आला आहे. आज आयोजित केलेल्या आयोगाच्या या बैठकीमध्ये 25 ऑगस्ट 2024 रोजी नियोजित महाराष्ट्र राजपत्रित नागरी सेवा संयुक्त पूर्व परीक्षा 2024 पुढे ढकलण्याचा मोठा निर्णय घेण्यात आला आहे.

विद्यार्थ्यांनी केली मोठी मागणी! :

मात्र आयोगाने यासंदर्भांतील परीक्षेची दिनांक लवकरात लवकर जाहिर करण्यात येईल असे ट्विट करून अधिकृतपणे घोषणा केली आहे. मात्र लोकसेवा आयोगाने पुढे ढकलण्यात आलेल्या परिक्षेत कृषी विभागाच्या तब्बल २५८ जागांचा समावेश करण्यात यावा.

तसेच या २५८ जागांसाठी परिक्षा घेण्याचे नोटीफिकेशन देखील आयोगाने काढावे अशी मागणी विद्यार्थ्यांनी केली आहे. तसेच याप्रकरणी आत्तापर्यंत आंदोलन मागे न घेण्याचा निर्णय विद्यार्थ्यांनी केला आहे. याशिवाय कृषी विभागाच्या जागांबाबत जोपर्यंत निर्णय होत नाही तोपर्यंत आंदोलन सुरुच राहणार असल्याचं सांगितलं आहे.

News Title : MPSC students Protest Pune Big Update

महत्त्वाच्या बातम्या-

शरद पवारांना कोण मारणार? भाजपच्या बड्या नेत्याचा खोचक टोला

अंगावर येईल काटा! पुणे-नगर महामार्गावरील अपघातात एक जण ठार

मोठी बातमी! बदलापूर प्रकरणातील अक्षय शिंदेबद्दल धक्कादायक माहिती समोर

55 कोटी लाभार्थ्यांसाठी आनंदाची बातमी! मिळणार मोठी आर्थिक मदत

Post Office ची जबरदस्त स्कीम; महिन्याला कमवा 20 हजारांपेक्षाही अधिक रुपये