बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

“31 जूलैपर्यंत एमपीएससीच्या रिक्त जागांबाबत केलेली घोषणा फसवी आहे”

मुंबई | आज पावसाळी अधिवेशनाचा पहिला दिवस पार पडला. आज सभागृहामध्ये एमपीएससी उमेदवार स्वप्नील लोणकरच्या आत्महत्येनंतर आज विधानसभेत एमपीएससीचा मुद्दा विरोधी पक्षाने जोरदार लावून धरला होता. यावर राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी एक घोषणा केली. 31 जुलैपर्यंत MPSCच्या सर्व रिक्त जागा भरू, असं त्यांनी म्हटलं आहे.

अजित पवार यांनी केलेल्या या घोषणेवरून राज्याचे माजी मुख्यमंत्री आणि विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवसी यांनी आपली प्रतिक्रिया दिली आहे. अजित पवार यांनी एमपीएससीबाबत केलेली घोषणा खोटी असल्याचा आरोप देवेंद्र फडणवीस यांनी केला आहे. आजचं अधिवेशन संपल्यानंतर फडणवीसांनी सभागृहाच्या बाहेर प्रसार माध्यमांशी संवाद साधला.

अजित पवार यांनी जी घोषणा केली 31 जूलै 2021 पर्यंत एमपीएससीतील रिक्त पदाची भरती करण्याची घोषणा केली आहे. ती भरती परिक्षा दिलेल्या उमेदवारांची नाही, तर संस्थेत रिक्त पदे भरणार आहेत, असा दावा देवेंद्र फडणवीसांनी केला आहे. तसेच एमपीएससी संस्थेमध्ये रिक्त पदाची भरती करण्यासाठी मुदत कशाला लागते. ती पदे कधीही भरता येतात, असा आरोप करत ही घोषणा फसवी असल्याचं फडणवसांनी सांगितलं आहे.

दरम्यान, सभागृहामध्ये अधिवेशनाच्या पहिल्याच दिवशी विरोधी आणि सत्ताधारी नेत्यांमध्ये अनेक मुद्यांवरून आरोप-प्रत्यारोपांची खेळी रंगली होती. एवढंच नाही तर विरोधी आणि सत्ताधारी नेत्यांमध्ये धक्काबुक्कीही झाल्याचं समजतं आहे. तसेच देवेंद्र फडणवीसांनी अजित पवारांच्या घोषणेवर केलेल्या आरोपावर अजित पवार काय प्रत्युत्तर देतात. हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे.

थोडक्यात बातम्या- 

नियतीचा खेळ! सासऱ्याचा मृतदेह नेत होता जावई अन्…, एकाच दिवशी माय-लेकी झाल्या विधवा

“विधानसभेच्या काही सदस्यांनी मला आई-बहिणीवरुन शिव्या दिल्या”- भास्कर जाधव

सगळे मरणार, फक्त राजकारणी जिवंत राहणार – प्रविण तरडे

“गुंडगिरी करून सत्ता काबीज करता येत नाही”

अधिवेशनात गोंधळ घालणार्‍या भाजपच्या 12 आमदारांवर एक वर्षांसाठी झाली ‘ही’ कारवाई

Shree

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More