बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

निवृत्त झालेला Mr.360 पुन्हा मैदानात?; पुनरागमनाबाबत डिव्हिलियर्सने दिलं ‘हे’ स्पष्टीकरण

नवी दिल्ली | मागील काही दिवसांपासून दक्षिण अफ्रिकेचा स्टार खेळाडू एबी डिव्हिलियर्स पुन्हा मैदानात येईल, अशी चर्चा क्रिकेट विश्वात रंगली होती. एबी डीव्हिलियर्सने 2018 मध्ये आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्ती घेत असल्याची घोषणा केली होती. बाकीच्या वर्कलोडमुळे आपण निवृत्ती घेत असल्याचं त्यांनी सांगितलं होतं. आयपीएलचा 14 वा हंगाम चालू असताना एबी पुन्हा मैदानात येऊन चमक दाखवेल अशी चर्चा चालू झाली होती.

क्रिकेटचा धुरंदर Mr.360 म्हणजेच एबी डिव्हिलियर्स पुन्हा दक्षिण आफ्रिकेकडून खेळणार नसल्याचं दक्षिण आफ्रिकेच्या क्रिकेट बोर्डानं सांगितलं आहे. दक्षिण आफ्रिकेच्या क्रिकेट बोर्डाने एक निवेदन जारी केलं आहे. त्यात, त्यांनी एबी डिव्हिलियर्सने निवृत्ती घेतली आहे आणि तो आता आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये परतणार नाही, असं सांगितलं आहे.

माझी निवृत्ती हा अंतिम निर्णय आहे आणि त्यात कोणताही बदल होणार नाही. म्हणजेच मी आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये परतणार नाही, असं एबी डिव्हिलियर्सने क्रिकेट बोर्डाला सांगितलं आहे. बोर्डाच्या सदस्यांनी एबी डिव्हिलियर्सला यावर स्पष्टीकरण मागितलं होतं. त्यावर त्यांनी प्रतिक्रिया दिली आहे.

दरम्यान, आयपीएलमध्ये राॅयल चॅलेजर्स बंगळुरू संघात एबी डिव्हिलियर्स आजही चांगली खेळी खेळतो. स्वतःच्या क्षमतेवर त्याने अनेक सामने फिरवले आहेत. जगातील लाडक्या क्रिकेटपटू पैकी तो एक आहे. डिव्हिलियर्सने आतापर्यंत 114 कसोटी, 224 वनडे आणि 78 टी-20 सामन्यांमध्ये दक्षिण आफ्रिका संघाचं प्रतिनिधीत्व केलं आहे.

थोडक्यात बातम्या-

नितीन गडकरींनी मोदी सरकारला दिला घरचा सल्ला, म्हणाले…

तुमचं SBI बँकेमध्ये काम आहे?, तर ही बातमी नक्की वाचा; बँकेने लागू केले नवीन नियम

लाॅकडाऊनमध्ये नोकरी गेल्यानंतर मुली लागल्या वेश्याव्यवसायाला, धक्कादायक प्रकार आला समोर

टुलकिट प्रकरणावरून केंद्रात भाजप-काँग्रेस आमनेसामने; वाचा काय आहे नेमकं प्रकरण

चिंता वाढली! महाराष्ट्रातील या जिल्ह्यात म्युकरमायकोसिसमुळे 26 जणांचा मृत्यू

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More