बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

किक्रेट विश्वातून मोठी बातमी समोर; सुरेश रैनाचा देशांतर्गत क्रिकेटला अलविदा

नवी दिल्ली | किक्रेट विश्वातून एक मोठी बातमी समोर येत आहे. भारतीय क्रिकेटमध्ये चमकणारं नाव आणि मिस्टर आयपीएल म्हणून ओळखला जाणारा क्रिकेटपटु सुरेश रैना याने (Suresh Raina) सर्व प्रकारच्या खेळामधून आपली निवृत्ती(Retirement) जाहीर केलीये.

सुरेश रैनाने त्याच्या ट्विटर हँडलवरुन ट्विट करत याबाबत माहिती दिली आहे. या ट्विटमध्ये त्यांना त्याच्या शानदार कारकिर्दित चाहत्यांना आणि ज्या संघासाठी तो खेळला त्यांचे आभार मानणारं ट्विट त्यांन केलं आहे. तो आता ख्रिस गेल, कायरन पोलार्ड यांच्याप्रमाणे देश-विदेशातील क्रिकेट लीगमध्ये खेळताना दिसणार आहे.

देशाच आणि उत्तर प्रदेश राज्याचे प्रतिनिधित्व करणं ही माझ्यासाठी सन्मानाची गोष्ट आहे. मी क्रिकेटचा सर्व फाँरमँटमधून माझी निवृत्ती जाहिर करु इच्छितो. अशा प्रकारचं ट्विट त्याने केलं आहे. यासोबतच त्यांनं बीसीसीआय(BCCI), चेन्नई आयपीएल (Chennai IPL) आणि युपीएसए (UPSA) चे आभार मानले आहेत.

रैनाने आतापर्यत 205 आयपीएल (IPL) खेळले आहेत. स्पर्धच्या पहिल्याच सत्रात त्यानं तब्बल 39 अर्धशतके आणि एकच शतक झळकावलं आहे. चेन्नई (Chennai) संघाच्या अनेक विजयात सुरेश रैनाचं मोलाचं योगदान आहे.

“अमित शहा यांनी काय-काय घोटाळे केले, मर्डर केले मला सगळं माहिती”

BIS SSA Admit Card 2022 | वरिष्ठ सचिवालय सहाय्यक/वैयक्तिक सहाय्यक परीक्षेबद्दल मोठी बातमी

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More