अभिनेत्री मृणाल ठाकूरचा खळबळजनक खुलासा!

महत्त्वाच्या बातम्यांसाठी ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Telegram Channel Join Now

Mrunal Thakur | मागील काही काळापासून भारतीय चित्रपटसृष्टीत अभिनेत्री मृणाल ठाकूरची क्रेझ वाढली आहे. अभिनेत्रीने आपल्या ग्लॅमरल लूकने चाहत्यांना भुरळ घातली. खरं तर ती बॉलिवूडसह साऊथ चित्रपटसृष्टीतही सक्रिय आहे. दोन्ही ठिकाणी तिला मुख्य भूमिका मिळत आहेत. तिच्या कामाचे कौतुकही होत आहे. पण एक काळ असा होता जेव्हा तिला तिच्याच शरीराची लाज वाटायची. कारण तिला वजन कमी करण्याचा सल्ला देण्यात आला.

मृणाल ठाकूर ‘सेक्सी’ नसल्याचे सांगून एका दिग्दर्शकाने तिला नाकारले असल्याचा खुलासा तिने केला. गेल्या काही दिवसांपासून मृणाल ठाकूरची इंडस्ट्रीत मागणी वाढली आहे. ती अशा स्टार्सपैकी एक आहे ज्यांचा अभिनय लोकांना आकर्षित करणारा आहे. पण एक वेळ अशी आली जेव्हा तिला वजन कमी करायला सांगितले गेले. तिला तिच्या लूकमुळे चित्रपट गमवावा लागला होता.

मृणाल ठाकूरला मोठा खुलासा

मृणाल ठाकूरने नुकत्याच दिलेल्या एका मुलाखतीत याचा खुलासा केला आहे. तिला दिग्दर्शकाने थेट नकार दिल्याचे तिने सांगितले. मृणालने त्याला किमान लूक टेस्ट घेण्याची विनंती केली, पण दिग्दर्शकाने तसे करण्यासही नकार दिला. मृणालच्या मते ती कोणत्याही प्रकारच्या भूमिकेत स्वत:ला जुळवून घेऊ शकते.

“मला माझ्या टीमवर पूर्ण विश्वास होता की ते माझ्यात बदल घडवून आणतील. एक अभिनेत्री म्हणून माझ्यासाठी तटस्थ राहणे खूप महत्त्वाचे आहे. जेणेकरून माझ्या आजूबाजूचे सर्व चित्रपट निर्माते मला कोणत्याही पात्रासाठी निवडू शकतील आणि मी त्यात सहभागी होऊ शकेन”, असे तिने सांगितले.

Mrunal Thakur ने सांगितला किस्सा

या मुलाखतीदरम्यान मृणालने बॉडी शेमिंगचा एक प्रसंगही मांडला. ती एक गाणे करणार होती. मात्र आजूबाजूच्या लोकांनी तिला हे गाणे गाण्यास मनाई केली. त्या लोकांच्या मते, मृणाल लठ्ठ आहे, म्हणजे तिच्या मांड्या जाड आहेत. त्या गाण्यासाठी तिला वजन कमी करावे लागले, असेही मृणालने नमूद केले.

अभिनेत्री म्हणाली की, मी एक गाणे केले होते. पण तू हे करू शकत नाहीस असे लोक म्हणाले. तुला वजन कमी करावे लागेल. मी म्हणाले की, ऐका, माझ्या जाड मांड्या आहेत आणि मी त्यात सोयीस्कर आहे. माझ्या लठ्ठपणामुळे मी अस्वस्थ नाही, तर तुम्ही का इतके अस्वस्थ का आहात?.

News Title- Actress mrunal thakur has revealed that she was rejected by the director as she was not sexy
महत्त्वाच्या बातम्या –

प्रतीक्षा संपली! IPL च्या 21 सामन्यांचे वेळापत्रक जाहीर; लवकरच CSK vs RCB थरार

माजी मुख्यमंत्री मनोहर जोशी यांचे निधन; 86 व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास

मोठी बातमी! शिवसेना ज्येष्ठ नेते मनोहर जोशींची प्रकृती चिंताजनक

‘धर्माच्या नावाखाली तू…’; बिग बॉस संपलं तरीही मुनव्वर फारुकी होतोय ट्रोल

मुंबई इंडियन्सच्या कर्णधारपदाबाबत रोहितची पत्नी पुन्हा बोलली, म्हणाली…