महेंद्रसिंह धोनीने घेतला सर्वांत मोठा निर्णय; पोस्ट करत म्हणाला..

MS Dhoni | यावर्षीच्या आयपीएल 2024 मधील चेन्नई सुपर किंग्जचे आव्हान आता संपुष्टात आलंय. एम चिन्नास्वामी स्टेडियमवर झालेल्या सामन्यात रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूने चेन्नईचा धुव्वा उडवत प्लेऑफमध्ये धडक मारली. त्यानंतर सर्वांच्या मनात एकच प्रश्न निर्माण झालाय. तो म्हणजे महेंद्रसिंह धोनी आता निवृत्ती घेणार की त्याचा हाच सामना शेवटचा होता?, याबाबत आता क्रिकेटविश्वात वेगवेगळे तर्क लावले जात आहेत.

अशात धोनीने फेसबुकवर पोस्ट करत मोठी घोषणा केली आहे. धोनीने फेसबूकवर 3 वाक्यांची पोस्ट केली आहे. या पोस्टमुळे आता चाहते संभ्रमात पडले आहेत. धोनीच्या मनात काय चाललंय हे कुणालाच माहीत नसतं. त्यामुळे तो कधी काय निर्णय घेईल याचा कुणालाच थांगपत्ता नसतो.

धोनीची पोस्ट चर्चेत

अशात धोनीने पोस्ट करत चाहत्यांची चिंता अजूनच वाढवली आहे.“झेप घेण्याची वेळ आहे. जे महत्त्वाचे आहे ते करण्याची वेळ आली आहे. मी माझी स्वत:ची टीम सुरु करत आहे!” अशी पोस्ट महेंद्रसिंह धोनीने फेसबूकवर केली आहे.

आता धोनीची नवी टीम कोणती असणार? ती टीम क्रिकेट संबंधित असणार की आणखी काही? याबाबतची क्रिकेट चाहत्यांना उत्सुकता लागली आहे.धोनीने अद्यापही आपल्या निवृत्तीची घोषणा केली नाहीये. अशात त्याची ही पोस्ट चर्चेत आलीये.

धोनी निवृत्ती घेणार?

दरम्यान, धोनीने आयपीएलच्या निवृत्तीबाबत कोणतेही वक्तव्य केलेले नाही. पण आता माहीच्या निवृत्तीशी संबंधित एक मोठी अपडेट समोर आली आहे. अंतिम निर्णय घेण्यापूर्वी काही महिने वाट पाहणार असल्याचे धोनीने टीम व्यसवथापकांना सांगितलं असल्याची माहिती आहे.

चेन्नई सुपर किंग्जने एमएस धोनीच्या नेतृत्वाखाली मागील हंगामात म्हणजेच आयपीएल 2023 मध्ये आयपीएलचे विजेतेपद पटकावले होते. 2023 मध्ये चेन्नईच्या विजयानंतर धोनी क्रिकेटला अलविदा करेल असे मानले जात होते, परंतु त्याने तसे केले नाही आणि चाहत्यांना गिफ्ट देत IPL 2024 मध्ये पुनरागमन केले. धोनीने 2020 मध्ये आंतरराष्ट्रीय क्रिकेटला अलविदा केला होता. पण तो आयपीएल खेळत राहिला आहे. आता पुढे तो काय निर्णय घेईल, ते आगामी काळात दिसून येईलच.

News Title – MS Dhoni Facebook post goes viral

महत्त्वाच्या बातम्या-

सध्या चर्चेत असलेल्या पोर्शे कारची किंमत आहे तरी किती? जाणून घ्या फीचर्स आणि किंमत

सोन्याचा ग्राहकांना मोठा दिलासा; ‘इतक्या’ रुपयांनी भाव घसरले

रश्मी ठाकरेंबाबत बड्या नेत्याचा गौप्यस्फोट, म्हणाले…

“पुणे शहरात आता टू-व्हिलर चालवायला सुद्धा भीती वाटत आहे”

दहावीचा निकाल ‘या’ तारखेपर्यंत लागणार; शालेय शिक्षण मंत्र्याने दिली माहिती