मुंबई | आपल्या ग्लोव्ह्ज वर सुरक्षा दलाचं बलिदान चिन्ह वापरल्यामुळे भारताचा क्रिकेटपटू महेंद्रसिंग धोनी सध्या चांगलाच चर्चेत आहे. आज ऑस्ट्रेलियाविरुद्ध होणाऱ्या सामन्यात धोनी काय करणार? याकडे साऱ्या क्रीडा विश्वाचं लक्ष लागलं आहे.
आयसीसीने नियमांकडे बोट दाखवत अशाप्रकारे सुरक्षा दलाचं चिन्ह वापरण्यास मनाई केली आहे. याबाबत बीसीसीआयने केलेली फेरविचार याचिका देखील आयसीसीने फेटाळली आहे.
धोनीला बलिदान चिन्ह वापरण्यास मनाई केल्यानं भारतीय क्रिकेट चाहते चांगलेच संतापले आहेत. भारतीय खेळाडू तसेच बीसीसीआय देखील या प्रकरणात धोनीच्या पाठीशी आहेत.
आता ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या सामन्यात धोनी आयसीसीपुढे झुकणार की आयसीसीचा निर्णय झुगारणार?, याकडे साऱ्यांचं लक्ष लागलं आहे.
महत्वाच्या बातम्या
-११ वर्षांच्या मुलीवर बलात्कार करुन मृतदेह स्मशानभूमीत फेकला
-धक्कादायक! गेल्या ६ वर्षात ग्रामीण युवकांच्या बेरोजगारीत ३ पटींनी वाढ
-भारतीय हवाई दलाच्या बेपत्ता विमानाची माहिती देणाऱ्यास बक्षिसाची घोषणा
-सांगलीत भाजप कार्यकर्त्यांची धारदार शस्त्राने वार करुन हत्या
-पराभव पाहण्याआधी मी मेलो का नाही…- चंद्रकांत खैरे
Comments are closed.