एमएस धोनीच्या आयपीएल निवृत्ती संदर्भात मोठी अपडेट; जाणून घ्या धोनी CSK ला कधी निरोप देणार?

MS Dhoni l एमएस धोनी चेन्नई सुपर किंग्जचा सर्वात यशस्वी कर्णधार होता. धोनीच्या नेतृत्वाखाली चेन्नईने एकूण पाच आयपीएल ट्रॉफी जिंकल्या आहेत. पण या हंगामात म्हणजेच आयपीएल 2024 मध्ये धोनीने चेन्नईची जबाबदारी स्वीकारली नाही. धोनीच्या जागी युवा फलंदाज ऋतुराज गायकवाडकडे सीएकेची जबाबदारी दिली आहे. ऋतुराज गायकवाडच्या नेतृत्वाखाली चेन्नईला प्लेऑफमध्ये संधी मिळाली नाही. अशातच आता धोनीच्या आयपीएल निवृत्ती संदर्भात एक मोठी अपडेट समोर आली आहे.

माहीच्या निवृत्ती संबंधित एक मोठी अपडेट समोर :

चेन्नईने आयपीएल 2024 चा शेवटचा सामना रॉयल चॅलेंजर्स बंगलोर विरुद्ध खेळला, ज्यामध्ये संघाला पराभवाचा सामना करावा लागला. या सामन्यानंतर अनेक माजी क्रिकेटपटू आणि तज्ञांनी धोनीचा हा शेवटचा आयपीएल सामना असल्याचे सांगितले होते. मात्र, धोनीने आयपीएलच्या निवृत्तीबाबत कोणतेही वक्तव्य केलेले नाही. पण आता माहीच्या निवृत्तीशी संबंधित एक मोठी अपडेट समोर आली आहे.

मात्र महेंद्रसिंग धोनीने निवृत्ती संदर्भात कोणतीही माहिती दिलेली आहे. त्यामुळे अंतिम निर्णय घेण्यापूर्वी काही महिने वाट पाहणार असल्याचे धोनीने सांगितले आहे. तसेच धोनी पुढच्या सीझनमध्येही दिसणार आहे. अशा परिस्थितीत धोनी पुढच्या मोसमात चेन्नईच्या जर्सीत दिसतो की त्याआधी क्रिकेटला अलविदा करतो हे पाहणे उत्सुकतेचे ठरणार आहे.

MS Dhoni l धोनीच्या नेतृत्वाखाली चेन्नईने 2023 मध्ये विजेतेपद पटकावले :

चेन्नई सुपर किंग्जने एमएस धोनीच्या नेतृत्वाखाली मागील हंगामात म्हणजेच आयपीएल 2023 मध्ये आयपीएलचे विजेतेपद पटकावले होते. 2023 मध्ये चेन्नईच्या विजयानंतर धोनी क्रिकेटला अलविदा करेल असे मानले जात होते, परंतु त्याने तसे केले नाही आणि चाहत्यांना गिफ्ट देत IPL 2024 मध्ये पुनरागमन केले. धोनीने 2020 मध्ये आंतरराष्ट्रीय क्रिकेटला अलविदा केला होता. पण तो आयपीएल खेळत राहिला आहे.

मात्र आता धोनीने निवृत्ती संदर्भात कोणतीही माहिती दिलेली नाही. त्यामुळे महेंद्रसिंग धोनी IPL च्या पुढील हंगामात पुन्हा पुनरागम करणार का याकडे सर्व क्रिकेटप्रेमींचे लक्ष लागले आहे.

News Title – MS Dhoni IPL Retirement

महत्त्वाच्या बातम्या

दुःखद घटना; राष्ट्राध्यक्षांचे हेलिकॉप्टर अपघातात निधन

फोर्ड कंपनी बाजारात धुमाकूळ घालणार; नवीन SUV कारची एंट्री

महत्वाची बातमी! हवामान विभागाने मान्सूनबाबत दिली महत्त्वाची अपडेट

राज्यातील ‘या’ दिग्गजांचं भवितव्य आज ठरणार! लोकसभा निवडणुकीचा पाचवा टप्पा कसा असणार?

आज या राशीच्या व्यक्तींना धनलाभ होण्याची शक्यता