MS Dhoni l एमएस धोनी पुन्हा एकदा चाहत्यांच्या मनावर राज्य करताना दिसला. लखनौ सुपर जायंट्सविरुद्ध (LSG) खेळलेल्या सामन्यात ११ चेंडूत २६ धावा करत सामनावीर ठरलेला धोनी, पुरस्कार स्वीकारताना मात्र नम्रतेने म्हणाला, “माझ्यापेक्षा नूर अहमदचं (Nur Ahmed) योगदान जास्त होतं, मग मला पुरस्कार कशाला?”
धोनीने मोडला वयस्कर खेळाडूचा विक्रम :
हा सामना IPL 2025 च्या चेन्नई सुपर किंग्जसाठी (CSK) अत्यंत महत्त्वाचा ठरला. सलग पाच पराभवानंतर हा दुसरा विजय त्यांना मिळाला. एमएस धोनीने शेवटच्या षटकांत शानदार खेळी करत संघाला ५ विकेट्सने विजय मिळवून दिला.
या सामन्यानंतर धोनी IPL इतिहासातील सर्वात वयस्कर ‘प्लेअर ऑफ द मॅच’ ठरला आहे. वयाच्या ४३ वर्षे २८१ दिवसां वयात त्याने हा सन्मान पटकावला. याआधी प्रवीण तांबे यांनी ४३ वर्षे ६० दिवसांमध्ये हा विक्रम केला होता.
MS Dhoni l “नूर अहमदची गोलंदाजी उत्कृष्ट होती” – धोनी :
पुरस्कार स्वीकारताना धोनी (MS Dhoni) म्हणाला, “नूर अहमदने ४ षटकांत केवळ १३ धावा दिल्या. त्यानेच एलएसजीला रोखून धरलं. माझी भूमिका शेवटी होती, पण मी सामनावीर ठरावं, याचं मला आश्चर्य वाटतं.” धोनीचा हा विनम्र आणि संघाभिमुख प्रतिसाद सध्या सोशल मीडियावर जोरदार व्हायरल होत आहे.
एमएस धोनीने IPL मध्ये आतापर्यंत २७१ सामने, ५३७३ धावा, २४ अर्धशतकं, ३७३ चौकार आणि २६० षटकार ठोकले आहेत. त्याची सर्वोच्च धावसंख्या ८४ आहे.