एमएस धोनीने चौथ्या क्रमांकावर फलंदाजीला यावे- रोहित शर्मा

सिडनी | भारत विरुद्ध ऑस्ट्रेलिया यांच्यातील पहिल्या एकदिवसीय  सामन्यातील धोनीची फलंदाजी बघता त्याने चौथ्या क्रमांकावर फलंदाजीला यावे, अशी इच्छा रोहित शर्माने व्यक्त केली आहे.

धोनी चौथ्या क्रमांकावर फलंदाजीला आला तर आमच्या संघासाठी चांगलेच आहे, असंही रोहित यावेळी म्हणाला.

ऑस्ट्रेलियाने दिलेल्या 289 धावांचा पाठलाग करताना भारताने 3.5 षटकातच 4 धावांवर 3 विकेट्स गमावल्या होत्या. यावेळी धोनीने पाचव्या क्रमांकावर फलंदाजीला येताना रोहितला चांगली साथ दिली होती.

दरम्यान, यामध्ये धोनीने 96 चेंडूत 51 धावा केल्या होत्या. तर रोहितने 133 धावांची धमाकेदार शतकी खेळी केली होती,पण भारताला पराभवाचं तोंड पाहावं लागलं.

महत्वाच्या बातम्या-

-“मोदींची भाषणं ऐकून मला ‘गजनी’तला आमिर खान आठवतो”

-आमच्या बहिणीने तर लहान मुलांच्या चिक्कीचे पैसे खाल्लेत- धनंजय मुंडे

-मुंबईतल्या उद्धव ठाकरेंच्या ‘घणाघाती भाषणातील’ प्रमुख मुद्दे एकाच ठिकाणी

-शिवसेनेला पटकणारा पैदा झाला नाही आणि पैदा होणारही नाही- उद्धव ठाकरे

-विष्णुचा अवतार राम मंदिर बांधू शकत नाही- उद्धव ठाकरे

Google+ Linkedin