दुबई | मुंबई इंडियन्स विरूद्धच्या सामन्यात चेन्नईच्या फलंदाजांची दाणादाण उडाली. मुंबईने चेन्नईवर 10 विकेट्स राखत मात केली. खराब कामगिरीचं सत्र सुरुच असून सामना गमावल्यानंतर कर्णधार महेंद्रसिंग धोनी हताश झालाय.
धोनी हताश होत म्हणाला, “आमच्या संघासाठी काय गोष्टी बिघडत गेल्या हे आम्हाला आता पहावं लागणार आहे. खासकरुन या वर्षाबद्दल म्हणायचं झालं तर हे वर्ष आमचं नव्हतंच.”
धोनी पुढे म्हणाला, आयपीएलच्या स्पर्धेत आम्ही आता ज्या जागेवर आहोत ते पाहून खरंच खूप वाईट वाटतंय. दुसऱ्या सामन्यापासून आमच्या संघाचं सगळंच गणित बिघडत गेलं असं मला वाटतं.
“खराब कामगिरीची 100 कारणं देता येतील. पण मुळात म्हणजे आम्ही यावर्षी आमच्या क्षमतेला साजेसा खेळ केलेला नाही. यंदा संघाला नशिबाचीही साथ देखील मिळाली नाही.” असंही धोनीने सांगितलं.
महत्वाच्या बातम्या-
महाराष्ट्रातील जनतेला मोफत कोरोना लस देऊ- नवाब मलिक
“रोहित पवारांनी समाजकारण नाही तर धंदा केला”
अनेकांना भाजप सोडण्याची इच्छा आहे पण….- एकनाथ खडसे
राष्ट्रवादीने सिंचन घोटाळ्याचा प्रमुख फोडला तरी त्याचा उपयोग होणार नाही, कारण…- राम शिंदे