पुणे महाराष्ट्र

सर्वसामान्यांना झटका; वीजपुरवठा खंडित करण्याचा महावितरणचा निर्णय

पुणे | पुणे जिल्ह्यात सध्या वीजबिलांची थकबाकी 1081 कोटींवर पोहोचली आहे. ग्राहकांचा वीजपुरवठा खंडित करण्याचा निर्णय महावितरणने घेतला आहे.

पुणे जिल्ह्यात वीजबिलाची थकबाकी सामान्यत: 70 कोटींपर्यंत होती. मात्र कोरोनाकाळात थकलेल्या विजबिलामध्ये ही थकबाकी तब्बल 1081 कोटीपर्यंत पोहोचली आहे.

वीजबिलाची थकबाकी असल्यामुळे त्याची आर्थिक झळ महावितरणला सोसावी लागत आहे. आता सरकारने थकित विजबिलाच्या बाबतीत कडक पवित्रा धारण केल्याचं दिसत आहे.

थकबाकीदारांना नोटीस पाठवून वीजबिल भरण्यास सांगितलं जाईल. तरीदेखील ग्राहकांनी प्रतिसाद न दिल्यास वीजपुरवठा खंडित करण्याची कारवाई सुरु करण्यात येणार असल्याची माहिती आहे.

थोडक्यात बातम्या-

राहुल गांधी देश तोडण्याची भाषा करत आहेत- स्मृती इराणी

महाविद्यालये अजून सुरू का नाहीत?; भगतसिंह कोश्यारींचा सरकारला सवाल

“संत आणि हिंदू धर्माच्या आस्थेचा अपमान करणं, ही काँग्रेसची जुनी परंपरा”

“फक्त अयोध्येतच का जाता, हिंदू धर्मात चारधाम आहेत, तिकडंही जा”

अभिनेत्री कंगणा राणावत दिसणार इंदिरा गांधी यांच्या भूमिकेत!

मेलवर बातम्या मिळवा

खालील रिकाम्या बॉक्समध्ये तुमचा ई-मेल आयडी टाका आणि Subscribe म्हणा. आमच्या बातम्या तुम्हाला ई-मेलवर मिळतील.

ताज्या बातम्या