बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

शेतकऱ्यांवर कोसळतोय दुहेरी अडचणींचा डोंगर, एकीकडे अतिवृष्टी तर दुसरीकडे…

लातूर | महाराष्ट्रात काही दिवसांपुर्वी झालेल्या पावसामुळे शेतकऱ्यांच्या अडचणीत मोठ्या प्रमाणात वाढ झाल्याचं चित्र पाहायला मिळत आहे. पीकांचं नुकसान झालं असताना आता राज्य सरकारकडून काही प्रमाणात मदत जाहीर करण्यात आली आहे. पण आता जेवढे धान्य आहे ते बाजारात विकण्यासाठी गेले तेव्हा व्यापाऱ्यांनी ठरवलेल्या दरात शेतकऱ्यांना मालाची विक्री करावी लागत आहे.

पावसामुळे झालेल्या नुकसानीने आधीच शेतकरी अडचणीत सापडला असताना आता नाफेडची कृषी उत्पन्न बाजार समितीतील हमीभाव केंद्रच बंद असल्याने शेतकऱ्यांवर दुहेरी संकट ओढावलं आहे. खरीप हंगामातील उडीद, तूर, मूग अशा धान्यांना आता व्यापारी ठरवतील तोच भाव लागू होत आहे.

हमीभावाची केंद्र राज्यात सुरू करण्यासाठी केंद्र सरकारला याबाबतचा एक प्रस्ताव पाठवणं बंधनकारक असतं. काही कारणास्तव हा प्रस्ताव केंद्र सरकारपर्यंत पोहोचण्यास अडचणी आल्या अखेर आता ऑफलाईन पद्धतीने हा प्रस्ताव पाठवण्यात आला असून 15 ऑक्टोबरपर्यंत केंद्रातून खरेदी सुरू होईल, असा विश्वास महाएफपीसीचे व्यवस्थापकीय संचालक योगेश थोरात यांनी व्यक्त केला आहे.

पडलेल्या दरात खरीप हंगामातील धान्याची विक्री करावी लागत असल्याने शेतकऱ्यांमधूनही नाराजीचा सुर उमटताना पाहायला मिळत आहे. त्यातच आता पावसाने या हंगामातील काढणीला आलेलं हातातील पीक पाण्यात गेल्याने शेतकरी राजा हवालदिल झाला आहे.

थोडक्यात बातम्या

…म्हणून कोरोनाची तिसरी लाट ठरु शकते भयावह, तज्ज्ञांकडून गंभीर इशारा

नातेवाईकांना रेल्वे फलाटावर सोडायला जाताय?, तर ही बातमी एकदा वाचा

मुंबईच्या अडचणी वाढल्या! कोलकाताने राजस्थानला केलं चारी मुंड्या चीत

पार्टीच्या ‘त्या’ रात्री नेमकं काय घडलं?; आर्यन खानने केला मोठा खुलासा!

‘पुढील 3 महिने अधिक महत्त्वाचे’; तिसऱ्या लाटेच्या पार्श्वभूमीवर केंद्र सरकारचा गंभीर इशारा

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More