MSRTC Bus Pass | एसटी बसने प्रवास करणाऱ्यांची संख्या बरीच मोठी आहे. गावखेड्यात अजूनही प्रवासी एसटी बसवर अवलंबून आहे.तर, काही ठिकाणी शाळेत जाण्यासाठी गावातील विद्यार्थी एसटी बसचा वापर करतात. अशाच विद्यार्थ्यांसाठी एक आनंदाची बातमी समोर आली आहे.
काही लहान गावात विद्यार्थ्यांना शाळेत जाण्यासाठी एसटी बस शिवाय कोणताच पर्याय नसल्याचे पाहायला मिळते.अशाच विद्यार्थांसह बसने प्रवास करणाऱ्यांसाठी आणि विद्यार्थ्यांसाठी एक महत्वाचा निर्णय घेण्यात आला आहे.
आता शाळेतच मिळणार एसटीचा पास
एसटीने प्रवास करणाऱ्या शाळकरी विद्यार्थ्यांना आता शाळेतच एसटी बसचा पास मिळणार आहे. महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाने शालेय विद्यार्थ्यांसाठी हा मोठा निर्णय घेतला आहे. या निर्णयानंतर राज्यातील विद्यार्थ्यांना पास काढण्यासाठी लांबलचक रांगेत उभं राहण्याची गरज पडणार नाही.
या निर्णयाचे आता राज्यभरातून (MSRTC Bus Pass) स्वागत करण्यात येत आहे. या मोहिमेतंर्गत शाळेतच आता पास मिळणार असल्याने शाळकरी विद्यार्थ्यांना त्याचा मोठा फायदा होणार आहे. ‘एसटी पास आता थेट तुमच्या शाळेत’ या मोहिमेअंतर्गत हे पास मिळणार आहे.
‘एसटी पास आता थेट तुमच्या शाळेत’मोहीम
राज्यातील अनेक विद्यार्थ्यांना आपल्या घरापासून शाळा किंवा कॉलेजला जाण्यासाठी एसटीने प्रवास करावा लागतो.आता शालेय पास काढणाऱ्या विद्यार्थ्यांना थेट शाळांमधूनच पास वितरीत केले जाणार आहेत.
यादरम्यान सर्व शाळा महाविद्यालयाच्या मुख्याध्यापक व प्राचार्य यांना एसटीच्या आगार व्यवस्थापकांनी पत्र देऊन आपल्या शाळेत नवीन वर्षात प्रवेश घेतलेल्या विद्यार्थ्यांची यादी तयार ठेवण्यास (MSRTC Bus Pass) सांगितले आहे. या योजनेचा लाभ लाखो विद्यार्थी-विद्यार्थिनींना होणार आहे.
News Title – MSRTC Bus Pass for School Students now in School
महत्त्वाच्या बातम्या-
शेतकऱ्यांनो स्मार्ट शेती करण्यासाठी हे 3 सोलर उपकरणे वापरा; खर्च होईल कमी
बकरी ईदनिमित्त आज पुण्याच्या वाहतुकीत मोठे बदल, पर्यायी मार्ग कोणते?
राज्याच्या महसूल विभागाचा गजब कारभार, जिजाऊंच्या पुण्यतिथीला जयंतीचं अभिवादन
पश्चिम बंगालमध्ये मोठी रेल्वे दुर्घटना; मालगाडी आणि एक्स्प्रेस रेल्वेची धडक
तरुणांनो बारमध्ये दारु पिण्यासाठी द्यावा लागणार हा पुरावा!