एसटी महामंडळात मेगा भरती; अर्ज करण्याची शेवटची संधी

MSRTC Recruitment

MSRTC Recruitment l नोकरीच्या शोधात असणाऱ्या तरुणांसाठी आनंदाची बातमी आहे. महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळ (MSRTC) अंतर्गत विविध तांत्रिक पदांसाठी 263 जागांची मेगा भरती जाहीर करण्यात आली आहे. इच्छुक उमेदवारांना 3 मार्च 2025 पर्यंत ऑनलाईन पद्धतीने अर्ज करता येईल.

कोणत्या पदांसाठी भरती? :

मेकॅनिक मोटार व्हेईकल – 55 पदे
मोटार व्हेईकल बॉडी बिल्डर – 60 पदे
मेकॅनिक ऑटो इलेक्ट्रिकल – 30 पदे
वेल्डर – 20 पदे
पेंटर – 06 पदे
डीझेल मेकॅनिक – 70 पदे
रेफ्रिजरेटर आणि एअर कंडीशनर टेक्निशियन – 10 पदे
इलेक्ट्रॉनिक्स तज्ञ – 10 पदे
अभियांत्रिकी पदवीधर (Graduate Engineer) – 02 पदे

MSRTC Recruitment l पात्रता आणि आवश्यक अर्हता :

वयोमर्यादा: 16 ते 33 वर्षे
उमेदवारांनी संबंधित ट्रेडमध्ये आयटीआय (ITI) उत्तीर्ण असणे आवश्यक आहे.
ऑटोमोबाईल आणि मेकॅनिकल इंजिनिअरिंग किंवा डिप्लोमा उत्तीर्ण उमेदवारांनाही संधी.
वेल्डर, पेंटर, इलेक्ट्रॉनिक्स, शीट मेटल वर्कर, डिझेल मेकॅनिक, रेफ्रिजरेशन आणि एअर कंडिशनिंग यासारख्या तांत्रिक पदांसाठी उमेदवारांनी संबंधित ITI कोर्स पूर्ण केलेला असावा.

भरतीसाठी अर्ज कसा कराल?

इच्छुक उमेदवारांनी एसटी महामंडळाच्या अधिकृत वेबसाइटवर जाऊन अर्ज भरावा.
ऑनलाईन अर्जाची अंतिम तारीख 3 मार्च 2025 आहे.
भरती प्रक्रियेसाठी योग्य शैक्षणिक कागदपत्रे आणि आवश्यक पात्रतेची पूर्तता करणे गरजेचे आहे.

सरकारी नोकरीसाठी सुवर्णसंधी :

एसटी महामंडळात नोकरी मिळवण्यासाठी ही उत्तम संधी आहे. तांत्रिक कौशल्य असलेल्या उमेदवारांसाठी ही भरती प्रक्रिया भविष्यात चांगल्या संधी निर्माण करू शकते. इच्छुक उमेदवारांनी अंतिम तारखेपूर्वी अर्ज सादर करावा.

NewsTitle: MSRTC Recruitment 2025: Apply for 263 Technical Posts Before March 3

Join WhatsApp

Join Now

संबंधित बातम्या

अधिक चांगल्या अनुभवासाठी ही बातमी Chrome मध्ये उघडा! आपण सध्या Facebook च्या ब्राउझरमध्ये हे पेज पाहत आहात. कृपया वरच्या उजव्या कोपऱ्यातील तीन बिंदूंवर क्लिक करून Open in external browser पर्याय निवडा .