MSRTC ST Bus | लालपरीने प्रवास करणाऱ्यांची संख्या प्रचंड मोठी आहे. आजही ग्रामीण भागात एसटी दळणवळणाचे मुख्य साधन आहे. अशात एसटीने प्रवास करणाऱ्या प्रवाशांसाठी नवीन वर्षात एक मोठी गुड न्यूज समोर आली आहे. परिवहन महामंडळाने नवीन वर्षात प्रवाशांना मोठं गिफ्ट दिलंय. आता एसटी बस कुठंपर्यंत आली आहे, हे प्रवाशांना त्यांच्या मोबाईलवर बघता येणार आहे. (MSRTC ST Bus )
एसटी महामंडळाने तयार केलेल्या अॅपच्या माध्यमातून प्रवाशांना लालपरीचे लाईव्ह लोकेशन मोबाइलवर कळणार आहे. एसटी तिकिटावर असलेल्या क्रमांकाच्या माध्यमातून बस स्टॅन्डवर येण्याची वेळ आता मोबाईलवर समजणार आहे. या सेवेचा प्रवाशांना मोठा फायदा होणार आहे. अनेकदा बस स्टँडवर येऊनही बस येण्यास विलंब होतो त्यामुळे प्रवाशांना ताटकळत बसावे लागते.
एसटीला व्हेईकल ट्रॅकिंग सिस्टिम बसवलं जाणार
मात्र, आता या नवीन अॅपमुळे प्रवाशांचा वेळही वाचणार आणि सेवा अधिक सुलभही होणार आहे. एसटीच्या ताफ्यातील सर्वच गाड्यांना व्हेईकल ट्रॅकिंग सिस्टिम (व्हीएलटी) बसविले जाणार असल्याने बसचे लाईव्ह लोकेशन आता मोबाईलवरच समजणार आहे. (MSRTC ST Bus)
राज्यात सध्या 50 हजार मार्गावर एसटीच्या सव्वालाख फेऱ्या होत असतात. यात लांब पल्ल्याचा प्रवास करणाऱ्या प्रवाशांना आगाऊ तिकीट काढूनही बस नेमकी कोणत्या ठिकाणी आली, याची माहिती मिळत नाही. मात्र, आता महामंडळाने तयार केलेल्या व्हीएलटीच्या मदतीने बस थांबे व त्यांच्या निवडलेल्या स्थानकात ती येण्याचा अपेक्षित वेळ 24 तास आधीच समजणार आहे.
अॅपद्वारे समजणार लाईव्ह लोकेशन
एसटीच्या प्रवाशांनी काढलेल्या तिकिटावर असलेला ट्रिप कोड एसटीच्या अॅप्लिकेशनमध्ये ट्रॅक बसवर टाकल्यावर तिचे लोकेशन समजणार आहे. त्यामध्ये इतर मार्गावरील गाड्या, त्यांची वेळ, त्या सर्व गाड्यांचे थांबे हे देखील समजणार आहे. तसेच यावर नियंत्रण ठेवण्यासाठी एसटीच्या मुंबई सेंट्रल मध्यवर्ती कार्यालयात अद्ययावत नियंत्रण कक्षाची स्थापना केली आहे. पुढील काही दिवसांत ही सुविधा लवकरच सुरू होणार आहे. (MSRTC ST Bus)
News Title : MSRTC ST Bus Mobile Vehicle Tracking System
महत्वाच्या बातम्या –
सरपंच हत्येपूर्वी वाल्मिक कराडने घुलेसोबत…; आतापर्यंतची सर्वात मोठी अपडेट समोर
धक्कादायक!पिस्तूल साफ करताना स्वतःवरच झाडली गोळी, आमदाराचा जागीच मृत्यू
आज वर्षाच्या पहिल्या प्रदोषव्रताला राशीनुसार करा ‘हे’ उपाय; शनिदोष होईल दूर
आज शनिप्रदोष, ‘या’ राशींवर होणार थेट परिणाम; सतर्क राहावे अन्यथा…
पीएम किसान योजनेच्या 19 व्या हप्त्यापासून ‘हे’ शेतकरी राहणार वंचित?